तक्रारकर्त्या महिलांविरोधात केला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:50 PM2018-05-11T22:50:47+5:302018-05-11T22:50:47+5:30
वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.
तालुक्यातील गोबरवाही येथील रेल्वे क्रॉसींग नजिक रेणुका लेकचंद मोहनकर यांची ४२ आर शेती आहे. शेतातच त्यांचे राहते घरही आहे. घरात एकूण १० व्यक्ती राहतात. त्या १० व्यक्तींमध्ये सात महिला आहेत. त्यांच्या शेतात एक रोहित्र व सहा खांब आहेत. ११ फेब्रुवारी २०१८ ला वादळासह जोरदार पाऊस पडल्यामुळे डिपीवरुन विद्युत तारांचे कनेक्शन तुटले. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयात रितसर लेखी तक्रारीची नोंदणीही तक्रार नोंदणी रजिस्टरवर केली होती. दरम्यान पाच दिवसानंतर विद्युत विभागाचे टवाळखोर कर्मचारी तिथे गेले असता त्यांनी व तिथे राहणाऱ्या मुलींची छेड काढली. त्यांना खडेबोल सुनावित वारंवार तुम्ही तक्रारी करता असे म्हणून ते निघून गेलेत. उलट विद्युत अभियंता यांनी तिथे राहणाºया रेणुका मोहनकर, मिनाक्षी मोहनकर, सिमा मोहनकर व हिरा मोहनकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी भादंवी ३५३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान घटनेसंबंधीची माहिती लोकप्रतिनिधीनांही देण्यात आली. परंतु अद्यापर्यंत कर्मचाºयांवरील कारवाईचे तर सोडाच ते पडलेले विद्युत तारही जोडण्यात न आल्याने तिथे जिवीत हानी होण्याची महावितरण विभाग वाट तर बघत नसावे ना? असा संतप्त सवाल पिडितांनी लोकमतशी बोलतांनी सांगितले.
या घटनेसंदर्भात गोबरवाही येथील सहायक अभियंता अरविंदकुमार पंधरे यांची प्रतिक्रीया घेण्याकरिता दुरध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
महावितरण विभागातील कर्मचाºयांनी आपले दृष्कर्म लपविण्यासाठी पोलिसांत खोटी तक्रार केली आहे. याबाबद उर्जामंत्र्यांनाही दोनदा निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापही विद्युत तारांची जोडणी झाली नाही, याला काय म्हणावे.
- सुनिता मोहनकर
जिल्हाध्यक्षा, क्रांतीदल सेना, तुमसर