तुमसरमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:40 AM2021-08-25T04:40:26+5:302021-08-25T04:40:26+5:30
केंद्रीय मंत्री पदाचा दुरुपयोग करून अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य करणाऱ्या राणे यांची पंतप्रधानांनी समजूत घालावी. जाहीर माफी मागावी, अन्यथा ...
केंद्रीय मंत्री पदाचा दुरुपयोग करून अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य करणाऱ्या राणे यांची पंतप्रधानांनी समजूत घालावी. जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाइलने उत्तर देऊन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नीलेश धुमाळ आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रवी वाढई यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्या विरोधात तक्रार दिली असून, त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, युवासेनेचे प्रवीण गुप्ता, शाखा प्रमुख निखिल कटारे, सतीश बन्सोड, चंदू येरपुडे, सचिन कनोजे, धम्मदीप सूर्यवंशी, मुनेश्वर वाघाये, आशिष मेश्राम, तुषार लांजेवार, सौरभ जीभकाटे, कोमल श्रीवास, रोशन निखाडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.