पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:51+5:302021-01-21T04:31:51+5:30

संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापक, संचालक मंडळ दरमहा मासिक सभा घेतात. मात्र चार सभांना बारसागडे यांना बोलाविले नाही. कोणतीही ...

Complaint of malpractice in credit union | पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार

पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार

Next

संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापक, संचालक मंडळ दरमहा मासिक सभा घेतात. मात्र चार सभांना बारसागडे यांना बोलाविले नाही. कोणतीही सूचनाही दिली नाही. बारसागडे गत २५ वर्षापासून या संस्थेत कार्यरत आहे. त्यांनीच या संस्थेतील कारभाराची तक्रार केली आहे. संस्थेने आयकर भरला नाही. परंतु जमा खर्च पत्रकात मात्र ८४ हजार रुपये इन्कम टॅक्सची नोंद केली आहे. याबाबत बारसागडे यांनी माहिती अधिकारातून माहिती मिळविली. त्यात इन्कम टॅक्स भरला नसल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे ही रक्कम गेली कुठे, असा प्रश्न तक्रारीत केला आहे. सदस्यत्व रद्द करणे आणि नव्याने सदस्यत्व मिळविण्यातही मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी प्रथम महाराष्ट्र मेटल पावडर कर्मचारी पतसंस्थेला दिली. परंतु त्यावर काहीही झाले नाही. त्यामुळे आता त्यांनी भंडारा सहायक निबंधकाकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु त्यावरही अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही.

Web Title: Complaint of malpractice in credit union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.