नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार
By admin | Published: October 12, 2015 01:11 AM2015-10-12T01:11:22+5:302015-10-12T01:11:22+5:30
ऐतिहासिक स्वामी विवेकानंद वाचनालयाची इमारत नियमबाह्य लिलाव करून लिजवर (भाडेतत्वावर) देण्याची प्रक्रिया करणाऱ्या संबंधित तुमसर...
चौकशीची भाजपची मागणी : इमारत तोडफोड प्रकरण
तुमसर : ऐतिहासिक स्वामी विवेकानंद वाचनालयाची इमारत नियमबाह्य लिलाव करून लिजवर (भाडेतत्वावर) देण्याची प्रक्रिया करणाऱ्या संबंधित तुमसर नगरपरिषद अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य तारिक कुरैशी तथा भाजयुमो जिल्हा महामंत्री अमित चौधरी यांनी नगरविकास मंत्री व नगरविकास प्रधान सचिवांकडे केली आहे.
तुमसरातील बोस नगरात ऐतिहासीक स्वामी विवेकानंद वाचनालयाची इमारत असून तिच्यावर तुमसर नगरपरिषदेचा मालकी हक्क (१९४०) आहे. या इमारतीचा नियमबाह्य लिलाव करून लिजवर देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. येथे नियमबाह्य लिज संबंधी कारवाई केली आहे. येथे ऐतिहासिक इमारतीची तोडफोड करण्यात आली.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ९२ (२), (३) चे उल्लंघन केलेले निदर्शनात आले आहे. येथे दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मो.तारिक कुरैशी तथा भाजयुमो जिल्हा महामंत्री अमित चौधरी यांनी केली आहे.
नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी भंडारा यांना या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे.
वाचनालयाचे प्रथम माळ्याचे जीर्ण असलेली इमारत किरकोळ दुरुस्ती करण्याची परवानगी दिली असताना इमारतीची तोडफोड करण्यात आली. चटई क्षेत्रफळ ७५.४४ चौ.मी. आहे. येथे प्रती मासिक भाडे केवळ ५२१४ इतके ठेवण्यात आले. भर बाजारात ही जुनी ऐतिहासिक इमारत आहे. प्रथम माळ्यावरील वाचनालयाची जागा तीन वर्षाकरिता भाड्याने देण्यात आली. सध्या येथे इमारतीचे अवशेष शिल्लक आहे.
इमारतीची तोडफोड कशी करण्यात आली असा प्रश्न कुरैशी यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. याप्रकरणामध्ये राज्य शासन काय करणार, अशी चर्चा शहरात चर्चीली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)