पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:40 PM2018-10-11T21:40:30+5:302018-10-11T21:40:46+5:30
पोलीस पाटीलांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीला घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटीलांच्या समस्या लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीस पाटीलांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीला घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटीलांच्या समस्या लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र शासनाने आॅगस्ट २०१४ च्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये पोलीस पाटलांना दरमहा ७,५०० रुपये मानधन देण्यात यावे, असा ठराव मंजुर केला होता. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी पोलीस पाटलांच्या राज्यस्तरीय अधिवशेनामध्ये पोलीस पाटील यांच्या संघटनेनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यापुर्ण करण्याची मागणी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघटना शाखा भंडारा यांच्या वतीने नुकतेच भंडारा येथे कर्मचाऱ्यांची सभा आयोजित केली होती. सभेमध्ये आमदार फुके यांना संघटनेच्यावतीने निवेदन दिले होते.