गोसीखुर्द जलस्तराचा दुसरा टप्पा पूर्ण

By Admin | Published: November 18, 2016 12:36 AM2016-11-18T00:36:18+5:302016-11-18T00:36:18+5:30

विदर्भातील सर्वात मोठ्या व महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम सुरु असून धरणामध्ये

Complete the second stage of the Gosikhurd Jalta | गोसीखुर्द जलस्तराचा दुसरा टप्पा पूर्ण

गोसीखुर्द जलस्तराचा दुसरा टप्पा पूर्ण

googlenewsNext

जलस्तर २४२.१०० मीटर : यावर्षी २४२.५०० मीटरचे उद्दिष्ट
पवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या व महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम सुरु असून धरणामध्ये दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे २४२ मिटर पर्यंतचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले आहे. आज धरणाचा जलस्तर २४२.१०० मिटर वर पोहचला आहे. या वर्षी धरणामध्ये २४२.५०० मिटर पर्यंत जलस्तर वाढविण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. जलस्तर वाढविल्यामुळे नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वीत होण्याला मदत होणार आहे. डाव्या कालव्याने सिंचन करायला मदत होणार आहे.
मागच्या वर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४२ मिटर पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट्य होते. पण जलस्तर वाढविल्यामुळे अनेक गावात पाणी शिरल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे नवीन गावठानात स्थानांतरण करायला अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मागच्या वर्षी सरकारने २४.८०० मिटर वर जलस्तर वाढविण्याचे काम थांबविले होते. पण जलस्तर वाढविण्याचे काम थांबविल्यामुळे राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या या धरणाला केंद्र सरकारकडून निधी मिळायला अडचणी येत होत्या. बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेजचा लाभ मिळाल्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे बुडीत क्षेत्राीतल गावे रिकामे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुनर्वसन कार्यक्रमाला गती आली. बुडीत क्षेत्रातील एक एक गाव रिकामे होऊ लागले व बुडीत क्षेत्रातील दुसऱ्या टप्प्यातील बहुतेक गावांनी नवीन गावठानात स्थानांतरण केले. त्यामुळे गोसेखुर्दचा जलस्तर वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला.
भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील वडद, अर्जुनी, पिपरी, जाख, बोरगाव (बु.), मौदी, महालगाव, पाथरी, सावरगाव आदी गावे नवीन गावठानात स्थानांतरीत झाले आहेत. चिचखेडा गावातील ७५ टक्के प्रकल्पग्रस्त नवीन गावठानात गेले आहे. या गावाला कोणताही धोका नाही. नागपूर जिल्ह्यातील मालोदा, गडपायली, उमरी, बोरीनाईक, मरुपार, पांजरेपार, सोनारखारी, थुटानबोरी, खराडा, सावंगी, गोठनगाव, तुडका, सालेशहरी, सालेभट्टी, तुडका आदी गावे स्थलांगतरीत झाले आहेत. त्यामुळे जलस्तर वाढविण्याला कोणतीही अडचण नव्हती.
यावर्षी आॅक्टोबर पासून गोसीखुर्दचा जलस्तर २४१.८०० मिटर पासून वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले. महिन्याच्या शेवटी दुसऱ्या टप्प्यातील २४२ मिटर वाढविण्याचे काम पूर्ण झाले. दिवाळी समोर असल्यामुळे जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते .मागील दोन दिवसापासून परत जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यातील जलस्तर आज २४२.१०० मिटरवर पोहचला आहे .यावर्षी जलस्तर २४२.५०० मिटर करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Complete the second stage of the Gosikhurd Jalta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.