शासकीय गाेदामात सडलेल्या धान्याचे तयार करणार कम्पाेस्ट खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:41+5:302021-09-05T04:39:41+5:30

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी संताेष गहणकर यांच्या स्वाक्षरीने आदेश २३ ऑगस्ट राेजी निर्गमित झाला. त्यात अखाद्य ...

Compost manure will be prepared from rotten grains in the government yard | शासकीय गाेदामात सडलेल्या धान्याचे तयार करणार कम्पाेस्ट खत

शासकीय गाेदामात सडलेल्या धान्याचे तयार करणार कम्पाेस्ट खत

Next

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी संताेष गहणकर यांच्या स्वाक्षरीने आदेश २३ ऑगस्ट राेजी निर्गमित झाला. त्यात अखाद्य धान्य विल्हेवाटीचा प्रस्ताव मंजूर झाला असून, अखाद्य कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागास खत तयार करण्यास देण्याची मान्यता दिली आहे.

बाॅक्स

साकाेली कृषी विज्ञान केंद्रात पाठविणार धान्य

सडलेल्या धान्यापासून कम्पाेस्ट खत तयार करण्यासाठी साकाेली कृषी विज्ञान केंद्रात पाठविले जाणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी या धान्यापासून कम्पाेस्ट खत तयार केले जाणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनात तहसील व कृषी विभाग संयुक्तरीत्या या धान्याची विल्हेवाट लावणार आहे.

काेट

शासकीय धान्य गाेदामातील सडलेल्या धान्याबाबत शासनाला पाठविलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. तहसील व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने या धान्याची विल्हेवाट लावण्याची सूचना प्राप्त झाली. सडलेल्या धान्यापासून कम्पाेस्ट खत तयार करता येऊ शकेल. जिल्हा पुरवठा विभाग त्याला मदत करेल.

- अनिल बन्साेड, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा

Web Title: Compost manure will be prepared from rotten grains in the government yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.