खमारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून संगणक चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:24 AM2021-07-11T04:24:15+5:302021-07-11T04:24:15+5:30
१० लोक ०९१० लोक ०९ भंडारा : भंडारा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या खमारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून संगणक चोरीला ...
१० लोक ०९१० लोक ०९
भंडारा : भंडारा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या खमारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून संगणक चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खमारी येथे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान व्हावे, याकरिता लोकवर्गणीतून संगणक विकत घेण्यात आले होते. हे संगणक वाचनालयातील खोलीच्या बाकावर ठेवले होते. गत काही दिवसांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे बालकांसह पालकही अनेक दिवसांपासून शाळेकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे अज्ञात चोरट्याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आसपास कुणीही नसल्याची संधी साधून मॉनिटर, सीपीयूसह संपूर्ण संगणकाचा संच चोरून नेला. याप्रकरणी मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. शाळेतून संगणक चोरीला गेल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. लोकवर्गणीतून संगणक विकत घेण्यात आले होते. शाळेतून चोरी झाल्याने आता परिसरातील शाळांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. चोरट्यांवर आळा घालण्यासाठी परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस सुरक्षा वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.