ढगाळ हवामानाने भेंडी पिकावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:00 PM2018-03-11T22:00:09+5:302018-03-11T22:00:09+5:30

आठवडा संपूनही वातावरण ढगाळ असल्याने नगदी पिकांवर मोठे संकट आले आहे. भंडारा जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षपणामुळे या वर्षाला सुमार बागायतीत वाढ झाली आहे.

Concentrate on okra crop with cloudy weather | ढगाळ हवामानाने भेंडी पिकावर संक्रांत

ढगाळ हवामानाने भेंडी पिकावर संक्रांत

Next
ठळक मुद्देदर कोसळले : उत्पादनात घट, भाजीपाल्याचा शेतकरी नैराश्याच्या खाईत

मुखरु बागडे ।
आॅनलाईन लोकमत
पालांदूर (चौ.) : आठवडा संपूनही वातावरण ढगाळ असल्याने नगदी पिकांवर मोठे संकट आले आहे. भंडारा जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षपणामुळे या वर्षाला सुमार बागायतीत वाढ झाली आहे. भेंडीचे बाग उत्तम सजले असताना हवामानाच्या वक्रदृष्टीने पिक किटकांच्या सावटात सापडले आहे. उत्पन्नावर विपरीत परिणाम असून दर्जाही घसरल्याने व्यापारी दर कमी देत शेतकºयांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे.
शासनस्तरावर शेतीला नवे आयाम देण्याकरिता भरपूर पाठपुरावा केला जातो. शेतकरी ही नव्या आशा मनी बाळगत नव्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याकरिता नवनवे प्रयोग करतो. मात्र शेतकºयांच्या पदरी निराशाच दिसत आहे. दिवाळीनंतर पावसाने विश्रांती घेताच बाग सजीवत जानेवारीपासून शेतमाल बाजारात दिसते. आरंभाला दर अधिक मिळतो. नंतर मात्र भाजीपाल्याची आवक वाढली की बाजारात नेण्याचा सुद्धा खर्च निघत नाही. यावर्षाला बºयाच शेतकºयांनी फुलकोबी न काढता शेतात नष्ट केले. २ ते ३ रुपये एवढ्या पडक्या दरातत ब्रोकोली विकावी लागली. भाजी २० ते २५ रुपये एवढ्या भावाने विकणारी आतापासूनच ७ रुपये प्रतीकिलो एवढ्या कमी दरात विकावी लागत आहे. वांगे, भटई यांनाही ५-७ रुपये किलो एवढाच दर असल्याने बागायतदार अडचणीत आला आहे.
जानेवारी ते मार्च पर्यंत भेंडी पिकाला दरवर्षी उत्तम दर मिळत होते. मात्र दर गडगडल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. भेंडी पिकाला संपूर्ण मशागत खर्चाचा अंदाज बांधला असता प्रतिकिलो ७ रुपये एवढा निश्चित आहे. मागील आठवड्यात ६ रुपये एवढ्या कमी दरात भेंडी विकावी लागली. अलिकडे १५ - १८ रुपये एवढा दर मिळत आहे. पण उत्पन्न कमी झाले आहे. शेतकºयांनी उत्पादीत तरी काय करावे की ज्यात त्याचा सन्मान वाढून आर्थिक स्थैर्य लाभेल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
भंडारा जिल्ह्यातील भेंडी चवदार व देखणी असल्याने देशासह दुबई शहरात पोहचली आहे. मात्र त्या तुलनेत अपेक्षित दर यंत्रणेकडून शेतकºयांना देत नाही. शेतकºयांची आर्थिक मुस्कटदाबी दलालांकडून होत असून प्रशासन हातावर हात ठेवून येरे माझ्या मागल्याची भूमिका निभावत आहे. शेतकºयाच्या शेतातून मालवाहक शेतमाल बाजारात स्वत: विकतो. शेतकºयाला खोटा भाव व वजन सांगून त्याची पिळवणूक करतो. गटागटाने शेती करीत विविध पिके उत्पादीत केली. स्वत: बाजारात गेला तर नक्कीच बाजाराची परिस्थिती अभ्यासून पिक उत्पादीत करायला व भाव निश्चितीला मार्ग मिळेल यात शंका नाही.सुमार अडचणींचा सामना करीत धानपिकाला डावलत भेंडीचे पिक एक एकरात लावले आहे. अपेक्षित भावाचा हंगाम संपण्याच्या वाटेवर आला. मात्र अजूनही खर्ची झालेले पैसे निघाले नाही. मजुरांच्या एकीने त्यांच्या सोईने मजुरी द्यावी लागते. मात्र आम्हा शेतकºयात ऐकी नाही हे दुर्भाग्य आहे, असे शेतकºयाकडून सांगण्यात आले.

बाजारातील दर मागणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. शेतकºयांनी बाजारपेठेचा अभ्यास ठेवूनच पिके निवडावी. यावर्षात मिरचीला उत्तम दर आहे. एकच पिक / भाजीपाला लावण्यापेक्षा विविध प्रकारची लागवड करावी. .
-बंडू बारापात्रे, व्यापारी, बीटीबी, भंडारा

Web Title: Concentrate on okra crop with cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.