कोथुर्णा येथे बुद्ध भीम मेळाव्याचे समापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:36 AM2018-02-09T00:36:05+5:302018-02-09T00:36:15+5:30
त्रिशरण महिला मंडळ, कोथुर्णा व समस्त बौद्ध बांधव कोथुर्णा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड, कोथुर्णा येथील पंचशिल बौद्ध विहाराच्या प्रांगणात ५ व ६ फेब्रुवारीला भीम मेळाव्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : त्रिशरण महिला मंडळ, कोथुर्णा व समस्त बौद्ध बांधव कोथुर्णा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड, कोथुर्णा येथील पंचशिल बौद्ध विहाराच्या प्रांगणात ५ व ६ फेब्रुवारीला भीम मेळाव्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
५ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता वरठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ठोबळे, सोमाजी रामटेके, आयु राहुल गजभिये यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व त्रिरत्न बुद्ध वंदना झाली. सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाराम खोकले हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप गायधने, भूमिका मेश्राम, विजय गायधने, शुभम लांजेवार, प्रफुल मेश्राम, सचिन लांजेवार, सोनु भवसागर, सतीश गजभिये, अभिषेक लिचडे हे प्रामुख्याने उपस्थितीत होते. त्याच प्रमाणे ६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता भिम अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रात्री ९ वाजता प्रसिद्ध प्रबोधनकार भगवान गावंडे यवतमाळ यांचा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून भारतीय बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रंजीत कोल्हाटकर भंडारा हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून विशेष सरकारी वकिल अमर चौरे हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भिमराव वैद्य, उमराव डोंगरे, कोथुर्णाचे सरपंच सुरेखा पवनकर, खैरीचे सरपंच ईश्वर ठवकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुखराम चोपकर, सामाजिक कार्यकर्ता सेवकराम नागफासे शुक्राचारी, ग्रा.पं. ईश्वरकर, शिला कांबळे, आशा बावनकर ग्रा.पं. सदस्या, बबीता भवसागर ग्रा.पं. सदस्या हे उपस्थित होते. संचालन नितीन खोब्रागडे यांनी केले.
तसेच प्रास्ताविक गौतम नागदेवे माजी सरपंच ग्रा.पं. कोथुर्णा आणि आभार राजेंद्र लांजेवार यांनी मानले. या दोन दिवसीय भिम मेळाव्याच्या आयोजनव नियोजनाकरिता त्रिशरण महिला मंडळाचे आयु. देविना वासनिक, मंदा नागदेवे, संघमित्रा मेश्राम, जिवनकला घोडेश्वार, निरू डोंगरे, कल्पना लांजेवार, उषा वाहाने, किरण नागदेवे, अहिल्या मेश्राम, पियुष वासनिक, समीर वाहाने, अक्षय खोब्रागडे, निखिल भोतमांगे, प्रमोद वाहाने, शुभम नागदेवे, शैलेश राहाने यांनी सहकार्य केले.