बेटाळा येथील उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:41 AM2021-02-20T05:41:17+5:302021-02-20T05:41:17+5:30
इंदुरखा वितरिकेच्या दुरुस्तीकरिता यांत्रिकी विभागाच्या मशीन या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत; परंतु प्रभावित भागात उभी पिके असल्याने कालव्याची दुरुस्ती ...
इंदुरखा वितरिकेच्या दुरुस्तीकरिता यांत्रिकी विभागाच्या मशीन या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत; परंतु प्रभावित भागात उभी पिके असल्याने कालव्याची दुरुस्ती करणे शक्य होणार नाही. शेतामध्ये पिके असल्याने कालव्याच्या पाळी उंच करण्यासाठी लागणारी माती मिळणे शक्य नाही. सद्यस्थितीत असलेले उन्हाळी हंगामाचे सिंचन संपताच इंदुरखा वितरिकेची दुरुस्ती करण्यात येईल, असे लेखी पत्र सहायक अभियंता श्रेणी-१, बावनथडी पाटबंधारे उपविभाग बघेडा यांनी उपोषणकर्त्यांना तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य सरिता चौरागडे यांना दिल्याने, तसेच चौकशी व पंचनाम्याअंती ६६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्याने बेटाळा येथे सुरू असलेले उपोषण शेतकरी सुखदेव ठोंबरे यांच्या हस्ते निंबू पाणी पिऊन उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी बेटाळाचे सरपंच रामसिंग बैस, मुरलीधर शेंडे, बावनथडी प्रकल्पाचे अधिकारी बावणकर, बडोले, के.बी. चौरागडे, दीपक निंबार्ते, अशोक निंबार्ते, प्रकाश तितिरमारे, वीरेंद्र ठोंबरे, संजय शेंडे, देवेंद्र मलेवार, विलास मलेवार, वच्छला डोरले, प्रमिला राऊत, शोभा शेंडे, गुलाब आगासे, शामकला निंबार्ते, बिनोद ठोंबरे, मोतीराम डोरले, दयाराम डोरले, चिंतामन मारवाडे, संगीता निंबार्ते आदी शेतकरी उपस्थित होते.