रस्त्याचे हाल, नागरिक बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:22+5:302021-07-22T04:22:22+5:30
अडयाळ : येथील सर्वांत शेवटच्या टोकावर असणारी एक दहा घरांची वस्ती म्हणजे टीचर कॉलोनी. महामार्गाचे काम झाले व आता ...
अडयाळ : येथील सर्वांत शेवटच्या टोकावर असणारी एक दहा घरांची वस्ती म्हणजे टीचर कॉलोनी. महामार्गाचे काम झाले व आता तिथे ये-जा करायला मातीचा रस्ता तयार करण्यात आला. यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा येथील ग्रामस्थांना ना धड पायदळी जाता येते, ना वाहनाने सुखरूप जाता येते. कंत्राटदाराने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. या मार्गाने एखाद्या रुग्णाला घेऊन जाणे म्हणजे दिव्यस्वप्नच.
ग्रामस्थांना कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या रस्त्यावर तथा रस्त्याच्या कडेला पडलेल्या लहान-मोठ्या भेगासुद्धा अजूनही भरल्या नाहीत. असा प्रकार नुसत्या अडयाळ गावातच नसून निलज फाटा ते कारधा या मार्गावर असलेल्या असंख्य गावांत हा प्रश्न आहे. महामार्गाला लागून असलेला हाच तो मुख्य रस्ता. पायदळसुद्धा जाता येत नाही. इथे अनेकदा ज्येष्ठ ग्रामस्थसुद्धा पडले; पण येथे साधी चुरीही घातली नाही.