‘सोंड्याटोला’चे ८० लाख रूपयांचे विद्युत देयक थकीत

By admin | Published: June 3, 2017 12:17 AM2017-06-03T00:17:58+5:302017-06-03T00:17:58+5:30

सिहोरा परिसरात असणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पकडे वीज वितरण कंपनीचे ८० लाखांचे विजेचे देयक थकीत आहे.

'Conditola' exhausted the electricity bill of 80 lakh rupees | ‘सोंड्याटोला’चे ८० लाख रूपयांचे विद्युत देयक थकीत

‘सोंड्याटोला’चे ८० लाख रूपयांचे विद्युत देयक थकीत

Next

प्रकल्प स्थळी अंधारच अंधार : शभर टक्के देयकाची सक्ती केव्हा होणार?
रंजीत चिचखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पकडे वीज वितरण कंपनीचे ८० लाखांचे विजेचे देयक थकीत आहे. यामुळे महावितरण कंपनीमार्फत मीटर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. परिणामी प्रकल्प स्थळी अंधार पसरला आहे.
पावसाळा तोंडावर असल्याने महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षात या प्रकल्पाने बावनथडी नदी पात्रातून चांदपूर जलाशयात पाण्याचा उपसा केला होता. यामुळे यंदा खरिप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले आहे. विज देयकाच्या थकबाकीवरुन महत्वाकांक्षी प्रकल्पाचे हस्तांतरण झाले नाही.
प्रकल्पाने उपसा केलेल्या पाण्याची विल्हेवाट आणि वाटप लघु पाटबंधारे विभागाची यंत्रणा करित आहे. शेतकऱ्यांकडून पाणी पट्टी कराची वसुली याच विभागाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. परंतु विजेचे देयक भरण्याची जबाबदारी आणि नियोजन या विभागाच्या नियंत्रणात नाही. यामुळे प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करतांना दरवर्षी राज्य शासनाला मदतीसाठी याचना करावी लागत आहे.
आॅगस्ट महिन्यात प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असतांना विद्युत देयकांचे नियोजन पाटबंधारे विभागापुढे नाही. याशिवाय शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला नाही. दरम्यान गेल्या वर्षात थकीत विजेचे देयक टप्याने करण्याचा करारनामा विदर्भ पाटबंधारे विभाग आणि विज वितरण कपंनी यांच्यात झाला होता. गेल्या वर्षात प्रकल्प स्थळात पाण्याची उपसा करण्यात आला असता ८० लाखाचे विद्युत देयकांची थकबाकी आहे. या देयकाच्या वसुलीकरिता प्रकल्प स्थळात नोटीस बजाविण्यात आली आहे. परंतु वितरण कंपनीला समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. कोट्यावधीच्या प्रकल्प स्थळात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
दरम्यान, प्रकल्पाची अंधारात सुरक्षा अडचणीत आली आहे. महिन्यात पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. अद्यापपर्यंत प्रकल्प स्थळात मशिन तथा पंपगृहाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली नाही. पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रकल्प सज्ज नाही. यामुळे यंदा प्रकल्प पाण्याचा उपसा करणार किंवा नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
विद्युत देयकांची थकबाकी शंभर टक्के भरल्यास प्रकल्पची वीज जोडणी पुर्ववत केली जाणार असल्याचा अल्टीमेटम वीज वितरण कंपनीने दिला आहे. राजकीय इच्छा शक्ती अभावी या प्रकल्पाला कायम स्वरुपी आधार मिळाला नाही.
वारंवार मायबाप सरकारला प्रकल्प सुरु आणि जिवंत ठेवण्यासाठी आर्थिक मदतीकरिता अजीजी करावी लागत आहे. या प्रकल्प स्थळाचे हस्तांतरण करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय टाकीतील गाळ काढण्याचा नियोजन तयार करण्यात आलेला नाही. गेल्यावर्षी गाळ काढण्यात आली होती. परंतु यंदा प्रकल्प स्थळात स्मशान शांतता पसरली आहे. अद्यापपर्यंत प्रकल्प स्थळात यंत्रणा पोहचली नाही. अशी माहिती मिळाली विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.

जलाशय रिकामा होणार
यंदा चुल्हाड शिवारात उन्हाळी धान पिकाला पाणी वाटप करण्यात आले. ६०० हेक्टरहून अधिक शेती ओलीताखाली आणण्यात आली आहे. यामुळे उन्हाळ्यात शिल्लक ठेवण्यात येणारे पाणी रिकामे करण्यात आले आहे. जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. खरीप हंगामाकरिता जलाशयात पाण्याचा उपसा करण्याची गरज आहे.

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे विजेचे थकीत देयकासाठी पत्र प्राप्त झाले नाही. जलाशयातील पाण्याचे वाटप आणि पाणीपट्टी कराची वसुली लक्ष पाटबंधारे विभाग करीत आहे.
- एन. जे. मिरत, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग सिहोरा
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे प्रकल्पातील समस्या निकाली काढतांना अजीजी करावी लागत आहे. कायम स्वरुपी समस्या निकाली काढण्यासाठी पुढाकाराची गरज आहे.
- मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ सिंदपुरी

Web Title: 'Conditola' exhausted the electricity bill of 80 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.