बालकांमध्ये सुसंस्कार रुजवा
By admin | Published: April 9, 2016 12:30 AM2016-04-09T00:30:27+5:302016-04-09T00:30:27+5:30
शरीरात ‘अथोरोस्पोसीस’ ची वाढ झाल्याने मधुमेहाला निमंत्रण मिळतो. यात बालकांमध्ये जास्त प्रमाणात मधुमेह आढळून आले.
जागतिक आरोग्य दिन : संजय वाणे यांचे प्रतिपादन
जवाहरनगर: शरीरात ‘अथोरोस्पोसीस’ ची वाढ झाल्याने मधुमेहाला निमंत्रण मिळतो. यात बालकांमध्ये जास्त प्रमाणात मधुमेह आढळून आले. याला आळा घालण्यासाठी सामाजिक व धार्मिकता यांची सांगड घालून शिक्षकांनी नैतीकतेचा बळावर सुसंस्कार रुजवावे, असे प्रतिपादन डॉ. संजय वाणे यांनी केले.
आयुध निर्माणी केंद्रीय विद्यालय भंडारा-जवाहरनगर येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त मधुमेह या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्यअतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक संघचे सचिव डॉ. चंद्रमोहन गुप्ता, अध्यक्ष दिनेश वसानी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम वसानी, प्राचार्य महिपाल सिंग, मुख्याध्यापक जे.एस.भाटीया, विजय भगत उपस्थित होते.
डॉ. वाणे म्हणाले, आजचा शिक्षक ताण-तणावात शिक्षणाचे कार्य करीत असतात. मानसिक तणावमुक्त जीवन जगणे उत्कृष्ट मानवाचे प्रतीक आहे. धर्म हेच नैतीक शिक्षण देण्याचे प्रभावी माध्यम आहे. सम्यक विचार, दृष्टी असावी, याप्रसंगी डॉ. चंद्रमोहन गुप्ता व प्राचार्य महिपाल सिंग यांनी मधुमेह कशारितीने दूर करता येतो, या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन मुख्याध्यापक जे.एस. भाटीया यांनी केले. आभार विजय भगत यांनी मानले.(वार्ताहर)