एसएनमोर महाविद्यालयात ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:38 AM2021-03-23T04:38:10+5:302021-03-23T04:38:10+5:30

या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील मराठी विभाग, मेन अगेन्स्ट व्हायलेन्स अँड अँब्युज (मावा), एम्पावर फाउंडेशन व एक स्वप्न-एक आशा फाउंडेशन ...

Conducting online workshops at SNmore College | एसएनमोर महाविद्यालयात ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन

एसएनमोर महाविद्यालयात ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन

Next

या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील मराठी विभाग, मेन अगेन्स्ट व्हायलेन्स अँड अँब्युज (मावा), एम्पावर फाउंडेशन व एक स्वप्न-एक आशा फाउंडेशन (भंडारा) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. उद्घाटकीय सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चेतनकुमार मसराम हे असतील. उद्घाटक हरीश सदानी (अध्यक्ष मावा) तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नारायण भोसले व डॉ.निर्मला जाधव हे उपस्थित राहतील.

या दोन दिवसीय कार्यशाळेतील पहिल्या सत्रात प्रवीण थोटे (मुंबई) हे ‘लिंगभेद’ या विषयावर मांडणी करणार असून, या सत्राचे अध्यक्ष डॉ.राहुल भगत हे राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात २४ मार्च रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत सूरज पवार (पुणे) हे ‘पितृसत्ता’ या विषयावर विचार व्यक्त करतील. डॉ.केदार देशमुख हे राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात दुपारी १२.३० ते २ या वेळेत वनिता तुमसरे (भंडारा) या ‘स्त्रीवाद’ या विषयावर मांडणी करतील. या सत्राचे अध्यक्ष डॉ.प्रदीप मेश्राम हे राहणार आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीशी संबंधित आहे. लिंगभाव, संवेदनशीलता, पुरुषसत्ताक संस्कृती व स्त्रीवादी विचारसरणी या विषयी समाजात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होण्याची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थी व समाजात जागृती निर्माण व्हावी, असा या कार्यक्रमाचा हेतू आहे. ही कार्यशाळा नि:शुल्क आहे. अधिकाधिक संख्येने विद्यार्थी, संशोधकांंनी असे आवाहन समन्वयक प्रा. रेणुकादास उबाळे, डॉ.राजेश दीपटे यांनी केले आहे.

Web Title: Conducting online workshops at SNmore College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.