१० प्रकल्पांत ठणठणाट

By admin | Published: April 11, 2017 12:34 AM2017-04-11T00:34:45+5:302017-04-11T00:34:45+5:30

वाढत्या उन्हाच्या दाहकेतेसोबतच पाण्याची टंचाईही निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

Conflict in 10 projects | १० प्रकल्पांत ठणठणाट

१० प्रकल्पांत ठणठणाट

Next

भीषण पाणीटंचाईचे संकेत : उपाययोजनांवर भर देण्याची गरज
इंद्रपाल कटकवार भंडारा
वाढत्या उन्हाच्या दाहकेतेसोबतच पाण्याची टंचाईही निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यातील दहा प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांपैकी २७ प्रकल्पांमध्ये २५ टक्यांपेक्षा कमीे जलसाठा आहे. बेटेकर बोथली व सोरणा या दोन्ही मध्यम प्रकल्पात शुन्य टक्के जलसाठा आहे.
जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभाग (राज्य) अंतर्गत एकूण ६३ प्रकल्प आहेत. यामध्ये ४ मध्यम, ३१ लघु तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. यात दोन मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांतर्गत कवलेवाडा, पवनारखारी, टांगा, हिवरा, आमगाव, डोडमाझरी तर जुने मालगुजारी तलावांतर्गत केसलवाडा, डोंगरगाव, ऐलकाझरी, जांभोरा, कोका तलावांमध्ये शुन्य टक्के जलसाठा शिल्लक आहे.
मध्यम प्रकल्पांतर्गत चांदपूर जलाशयात १४.९२ टक्के व बघेडा जलाशयात ३० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय लघु प्रकल्पांतर्गत कुरमडा, आंबागड, परसवाडा, कार्ली, मंडनगाव, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली अंबाडी, कातुर्ली, शिवनीबांध, कुंभली, सालेबर्डी, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, खुर्शीपार तर जुने मालगुजारी तलावांतर्गत एकोडी, चांदोरी, वलमाझरी, पिंडकेपार, सावरबंध, खंडाळा, चान्ना, लोभी, दिघोरी, दहेगाव व झरी तलावात २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. एकूण जुने मालगुजारी २८ तलावांमध्ये फक्त २६.७३ जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा जास्त असला तरी उन्हाळ्याची तीव्रता पाहून हा आकडा कमी वाटतो. ३१ लघु प्रकल्पात १७.९० टक्के जलसाठा असून दोन मध्यम प्रकल्पातील पाण्याची टक्केवारी १३.२५ इतकी आहे.

पाणीटंचाईचे संकट
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने व उन्हाळ्याची तीव्रता पाहून येणाऱ्या दिवसात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होईल यात दुमत नाही. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत व आराखड्यानुसार संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू असल्या तरी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रयत्न होत आहे.

Web Title: Conflict in 10 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.