बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:42+5:302021-05-06T04:37:42+5:30
मंडळाने अद्याप वेळापत्रक जाहीर न केल्यामुळे नेमक परीक्षेचे काय होणार? याबाबत अस्वस्थता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ...
मंडळाने अद्याप वेळापत्रक जाहीर न केल्यामुळे नेमक परीक्षेचे काय होणार? याबाबत अस्वस्थता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यभर सध्या निर्बंध लावण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या या भीषण परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा शासनाचे रद्द केलेली आहे. परंतु बारावीची बोर्ड परीक्षा मे अखेरीस घेण्याचे ही त्याच वेळी राज्य शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आले होते. असे असले तरी अजूनही बारावीच्या बोर्ड परीक्षेचा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला नाही. कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. त्यामुळे परीक्षा आणखी पुढे ढकलण्यात येतील का असा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये निर्माण झालेला आहे.
शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक तुटलेली आहे. यावर्षी बारावीचा अभ्यासक्रम पूर्णतः नवीन आहे. प्रश्नपत्रिका ऐवजी आता विद्यार्थ्यांना कृती पत्रिका मिळणार आहे. बहुतांशी महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम घेण्यात आला. फार कमी वेळ विद्यार्थी विद्यालयात उपस्थित राहिले, त्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी सराव फार कमी झाला. दहावीची बोर्ड परीक्षा कोरोना महामारीमुळे रद्द झाल्यामुळे बारावीच्या परीक्षेचे काय होईल? या अनिश्चितेत विद्यार्थी, पालक व शिक्षक आहेत .