रब्बी धान पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:23+5:302021-07-05T04:22:23+5:30

करडी (पालोरा) : मोहाडी तालुका कृषी विभागाच्या वतीने सन २०२०- २१ वर्षातील रब्बी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर घेण्यात ...

Congratulations to the winning farmers of Rabi Paddy Crop Competition | रब्बी धान पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

रब्बी धान पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

Next

करडी (पालोरा) : मोहाडी तालुका कृषी विभागाच्या वतीने सन २०२०- २१ वर्षातील रब्बी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या भरघोष पीक उत्पादन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रदीप कावळे (रा. करडी), द्वितीय विक्रांत........... (रा. नवेगाव बूज) यांनी मिळवला. तसेच रमेश उरकुडे (रा. कांद्री) यांनी पुरस्कार पटकाविला. विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. मोहाडी पंचायत समितीच्या बचत सभागृहात कृषी दिन व कृषी संजीवनी मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषिभूषण सन्मानित शेतकरी प्राणहंस मेहर (रा. कुशारी) यांनी केले. अध्यक्षस्थानी मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, कृषी अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी बी. एन. मेहर हजर होते.

यावेळी विष्णू अथिलकर (रा. पिंपळगाव झंझाड) यांना सन २०१८-२०१९ मधील शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्याचे नियोजित होते. परंतु ते हजर नसल्याने त्यांच्या मुलांकडे सन्मानपत्र व शाल, श्रीफळ, रोपटे सोपविण्यात आले.

सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी भाग्यवान भोयर यांनी केले. यावेळी ग्रामस्तरावरील इतर पुरस्कार विजेते शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली.

हरभरा पीक स्पर्धा विजेत्यांना रक्तचंदन झाडांची भेट

कोट

२०२०-२०२१ या वर्षात हरभरा पीक स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अजित गजभिये (रा. भोसा) व प्राणहंस मेहर यांना रक्तचंदनाच्या झाडांची रोपे भेट म्हणून देण्यात आली. सदर रोपांची जोपासना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

040721\img-20210704-wa0040.jpg

रब्बी धान पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

Web Title: Congratulations to the winning farmers of Rabi Paddy Crop Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.