पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेस संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:04 AM2018-04-13T01:04:14+5:302018-04-13T01:04:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वात जास्त दरवाढ विरोधात पवनी शहर व तालुका काँग्रेस कमेटीद्वारा माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांचे प्रमुख उपस्थितीत पेट्रोल व डिझेलच्या विक्रमी दरवाढीच्या विरोधात निषेध करुन निवेदन तहसीलदार पवनी यांचेमार्फत प्रधानमंत्री, पेट्रोलीयम मंत्री व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी असतांना अतिरिक्त अधिभार लावून देशातील सर्वात जास्त विक्रमी दरवाढ महाराष्ट्रात करण्यात आली आहे. याचा निषेध करुन दरवाढ कमी करण्यात यावी, या मागणी सोबतच स्वामीनारायण समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतमालाला भाव निश्चित करणे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येवून चालु खरीप हंगामात शासनाकडून शेतकºयांना मदत देणे, ३० जून २०१७ च्या मत्स्यव्यवसायाचा शासन निर्णय रद्द करणे, काँग्रेस नेत्यांविरुध्द अपमानास्पद वक्तव्य करणाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
शिष्टमंडळात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, अखिल भारतीय काँग्रेस मच्छीमार विभागाचे सचिव प्रकाश पचारे, जि.प. माजी सभापती विकास राऊत, तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे, शहराध्यक्ष मनोहर उरकुडकर अशफाक पटेल, माजी जि.प. सदस्य मोहन पंचभाई, पंचायत समिती सभापती बंडु ढेंगरे, जि.प. माजी सदस्य युवराज वासनिक, निलकंठ टेकाम, अर्चना वैद्य, खरेदी विक्री सह संस्थेचे अध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, गोपाल नंदरधने, कमलाकर रायपुरकर उपाध्यक्ष न.प. पवनी, शंकरराव मुनरतीवार, ताराबाई नागपुरे, मिराबाई उरकुडकर, रेखा गोटाफोडे, डॉ. सुनिता गभने, रामकृष्ण रामटेके, बाळकृष्ण रामटेके, शाम धनविजय, निलेश सावरबांधे, अवनती राऊत, प्रकाश पडोळे, मारोतराव नागपुरे, प्रकाश भोगे, रिंकु सेलोकर, ओमप्रकाश खोब्रागडे, मनोज देशमुख, गोपाल भिवगडे, धर्मेंद्र नंदरधने, नथ्थु हटवार, नानाभाऊ कुझेकर, श्रीधर रामटेके, अनिल बावनकर, जगदिश पराते, आनंद वाहने, ज्ञानेश्चवर पारधी आदी पदाधिकारी शहरातील आणि तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.