२५ वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेसचे कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 05:01 PM2024-06-05T17:01:56+5:302024-06-05T17:03:31+5:30

Bhandara : तरुण उमेदवाराच्या गळ्यात मतदारांनी घातली विजयश्री

Congress comeback in the constituency after 25 years | २५ वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेसचे कमबॅक

Congress comeback in the constituency after 25 years

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
तब्बल २५ वर्षांनंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचे कमबैक इहले आहे. विजयाचे दावे-प्रतिदावे शिगेला पोहोचले असताना काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी थेट लोकसभेत पाऊल टाकले आहे. त्यांच्या विजयामुळे काँग्रेसचे मनोबल वाढले असून भाजपला मात्र या निवडणुकीत बँकफूटवर नावे लागले आहे. १८ व्या लोकसभेसाठी या मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात होते. असे असले तरी खरी लढत काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे आणि भाजपचे उमेदवार सुनील मेंढे या दोन उमेदवारांमध्येच झाली. प्रत्येक फेरीसोबत उत्कंठा वाढविणारी आणि एकमेकांवर मात करणारी लढत या वेळी मतदारसंघातील जनतेने अनुभवली. बहुजन समाज पक्षाचे संजय कुंभलकर आणि बंचित बहुजन आघाडीचे संजय केवट यांची उमेदवारीही महत्त्वाची मानली गेली होते. यासोबतच माजी आमदार सेवक वाधाये यांची उमेदवारीही चर्चेची ठरली होती. मात्र वाघाये यांचा फारसा प्रभाव वा निवडणुकीत दिसला नाही. बसपा आणि वंचितचे उमेदवारही अपेक्षित मते घेऊ शकले नाहीत, यामुळे खरी लढत काँग्रेस आणि भाजप या दोन उमेदवारांमध्येच झाली.


सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीच्या ३१ फैन्ऱ्या झाल्या, रात्री उशिरापर्यंत मतमोजणीचे काम सुरु होते. फेऱ्यांच्या घोषणेआधीच प्रोग्रेसिव्ह मतांचे आकडे बाहेर येत असल्याने मतमोजणीचा कल काय आहे याचा अंदाज जनतेला आधीच कळत होता. यामुळे दुपारी पडोळे पुढे असल्याचे लक्षात येताच तीन वाजतापासूनच गुलाल उधळणे सुरू झाले होते.


दिवसभर मतमोजणी केंद्र परिसरात नागरिकांची म्हणावी तशी गर्दी नव्हती. मात्र दुपारनंतर हळूहळू ती वढायला लागली. सायंकाळी भंडारा शहरासह गोंदिया जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झाले, सायंकाळपासूनच प्रशांत पडोळे यांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसत होते. जिल्हाभर या विजयाचा उत्सव दिसत होता.


माझा एकट्याचा नव्हे, हा जनतेचा विजय !
मताधिक्याने जनता जनार्दनाने आपणाला निवडून दिले. हा माझा नव्हे, तर जनतेचा विजय आहे. महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तळमळीने काम केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तम नियोजन आखून दिले. त्यामुळे ही विजयश्री मिळाली आहे...


विजयचे श्रेय कुणाला देता?
प्रशांत पडोळे: या विजयाचे श्रेय उळमळीने काम करणाऱ्या सर्व कार्यकत्यांना, महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना आपण देतो.

विजयाचे गमक काय? 
प्रशांत पडोळे : मागील १० वर्षांत या मतदारसंघात विकासच झाला नाही. बेरोजगारी, औद्योगिकीकरण, सिंचन, वीज यांसारखे अनेक प्रश्न सुटू शकले नाहीत. त्यामुळे जनता नाराज होती. ते प्रश्न आपण मार्गी लावू

ही सहानुभूतीची लाट होती का? 
प्रशांत पडोळे: तसे म्हणता येणार नाही. मात्र, आपले पिताश्री यादवराव पडोळे यांनी मनापासून ओडलेल्या माणसांचे आशीर्वाद आपणास मिळाले. त्यांनी विकासासाठी निवडून दिले, याची सदैव जाणीव ठेवून काम करू, मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हेच आपले प्राथमिक कार्य असेल.


फेरीगणिक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या मनावर ताण
 • मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेयांचा काल नंतरच्या टप्प्यात बदलला. यामुळे प्रत्येक फेरीनंतर होणाच्या घोषणेवर उमेदवार व कार्यकत्यांच्या मनावर ताण वाहत असलेला दिसत होता.

 • सुरुवातीच्या फेयांमध्ये भाजप उमेव्वाराने सलग आघाडी घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराचे लीड पाडले. नंतरच्या ठप्प्यात कधी भाजप पुढे, तर कधी काँग्रेस असे चित्र सातत्याने बदलत राहिले.

 • पंधराव्या फेरीनंतर काँग्रेस उमेदवाराने मीठ घेतली. ती नंतरच्या फेरीपर्यंत पाढतच गेली. त्यांचे मताधिक्य चाहत असल्याचे पाहून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोशात आले.

 • पलाडी येथील मतमोजणी केंद्रावर निकाल काय लागली, चाची उत्सुकता उमेदवारांच्या समर्थकांसह मतमोजणी केंद्रावर विविध कामांसाठी नियुक्त असालेल्या कर्मचायांनासुद्धा होती.
 

Web Title: Congress comeback in the constituency after 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.