हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा
By admin | Published: November 30, 2015 12:47 AM2015-11-30T00:47:53+5:302015-11-30T00:47:53+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूर विधानसभेवर शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित व इतर बेरोजगार, महिलांवरील होत असलेल्या ...
भंडारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूर विधानसभेवर शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित व इतर बेरोजगार, महिलांवरील होत असलेल्या अन्याय व अत्याचार, राज्याची ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, सातत्याने वाढत असलेली महागाई व इतर ज्वलंत प्रश्नावर झोपी गेलेल्या युती शासनाला जागी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. ८ डिसेंबर २०१५ ला नागपूर विधानसभेवर मोर्चाचे आयोजन केलेले आहे.
या मोर्चाला यशस्वी करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिया पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक दि. २६ नोव्हेंबर ला भंडारा येथे झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी पक्षश्रेष्ठींकडून मोर्चासंबंधी प्राप्त झालेल्या सूचना व निर्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. मोर्चात उपस्थितीसाठी सर्व तालुका व शहर अध्यक्षांनी, स्थानिक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यगण, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय. व पक्षाचे सर्व सेल व विभागाचे पदाधिकाऱ्यांसोबत स्थानिक पातळीवर नियोजन करावे असे निर्देश दिले. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित व इतर बेरोजगार यांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिया पटेल यांनी कळविले आहे.
या बैठकीत माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, तुमसर नगर परिषदेचे पक्षनेता प्रमोद तितीरमारे, भंडाराचे तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, पवनीचे तालुका अध्यक्ष माणिक ब्राम्हणकर, मोहाडीचे तालुका अध्यक्ष प्रभू मोहतुरे, लाखांदूरचे तालुका अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, साकोलीचे माजी तालुका अध्यक्ष मार्तंड भेंडारकर, लाखनीचे तालुका अध्यक्ष सुनील गिऱ्हेपुंजे, मोहाडीचे नगरसेवक सुनील गिऱ्हेपुंजे, भंडारा शहर अध्यक्ष सचिन घनमारे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अनिल बावनकर, संदेश शामकुवर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)