हेगडेंच्या वक्त्यव्याचा काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:25 AM2017-12-31T00:25:30+5:302017-12-31T00:25:41+5:30

भंडारा शहर व तालुका काँग्रेस, शहर अनुसूचित, शहर युवक काँग्रेस, शहर महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे केंद्रीय मंत्री हेगडे यांच्या निषेधासाठी त्यांनी केलेले भाजपच्या मंत्र्यांचे वक्तव्य ‘भारतीय संविधान बदलविण्यासाठी सत्तेवर आलो.’

 Congress protest from Haggai protest | हेगडेंच्या वक्त्यव्याचा काँग्रेसकडून निषेध

हेगडेंच्या वक्त्यव्याचा काँग्रेसकडून निषेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहर व तालुका काँग्रेस, शहर अनुसूचित, शहर युवक काँग्रेस, शहर महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे केंद्रीय मंत्री हेगडे यांच्या निषेधासाठी त्यांनी केलेले भाजपच्या मंत्र्यांचे वक्तव्य ‘भारतीय संविधान बदलविण्यासाठी सत्तेवर आलो.’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे. यांच्या निषेधार्थ त्यांच्या फोटोला काळे फासले व नारेबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन घनमारे व तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत यांनी व काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
अनंतकुमार यांनी धरनिरपेक्ष वादावर निशाणा साधत आम्ही मुळातच भारतीय संविधान बदलविण्यास सत्तेवर आले. असे देशद्रोही विधान करुन भारतीय संविधानाचा व संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देशाचा अपमान केला. अशा भाजपा व संघाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तालुका व शहर अध्यक्षांनी केली. याप्रसंगी तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, धनराज साठवणे, पक्ष नेता शमीम शेख, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष विनीत देशपांडे, महिला शहर अध्यक्ष भावना शेंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष कमलेश बाहे, सरपंच मोरेश्वर गजभिये, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आवेश पटेल, जीवन भजनकर, जि.प. सदस्य प्रेम वनवे, नगर सेवक जाबीर मालाधरी, पृथ्वीराज तांडेकर, ईरफान पटेल, अंबादास मंदुरकर, सुहास गजभीये, भारतीय लिमजे, शमीम पठाण, प्रविण भोंदे, संदेश शामकुवर, अंकुश वंजारी, प्रशांत सरोजकर, राकेश कडबे आदी उपस्थित होते.

Web Title:  Congress protest from Haggai protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.