ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस उतरली रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:10+5:302021-06-27T04:23:10+5:30
यातच आता राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात १९ जुलै ...
यातच आता राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात १९ जुलै रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर २० जुलै २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते घेत असताना आता निवडणुका लागल्याने हा मुद्दा पेटणार असल्याचे चिन्ह आहे. राजनीतिक आरक्षण संविधानिक लोकशाही संपवण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे असून त्यांच्या इशाऱ्यावर चालत असलेली देशातील सरकार आरक्षण संपविण्याचे काम करत आहे. ओबीसीचे राजकीय प्रतिनिधित्व घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा डाव असल्याचे बोलत तुमसर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने बावनकर चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, तालुका अध्यक्ष शंकर राऊत, शहर अध्यक्ष अमर रगडे, नगरसेवक राजेश ठाकूर, महिला महासचिव सीमा भुरे, महिला शहर अध्यक्ष करुणा धुर्वे, माजी सभापती कुसुम कांबळे, तालुका अध्यक्ष महिला सीमा भुरे, प्रदेश सचिव शुभम गभने, कान्हा बावनकर, नीरज गौर, विजय गिरेपुंजे, अमित लांजेवार, गुलराज कुंदवानी, चैनलाल मसरके, कमलाकर निखाडे, रोहित बोंबर्डे, हसन रजवी, रवी सार्वे, अजीम खान, रामेश्वर मोटघरे, रामप्रसाद काहलकर, नंदलाल गुर्वे, कृष्णकांत बघेले, कैलास बहिरे, गळीराम बांडेबूचे, गौरी पंचबुद्धे, नामदेव कांबळे, सद्दाम भाई, मिलिंद गजभिये, गणेश सोनुसार, दिलीप लांजेवार, विलास उपरिकर, राजेश मानकर, अलोक बनसोड, योगिता बावनकर, वनिता मलेवार, वेदांत गंगाभोज, उज्ज्वला टेंबरे, सुषमा सिंगणजुडे, निशा गणवीर, चैनलाल पटले उपस्थित होते.