सुकळी येथे काँग्रेसची चिंतन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:03 PM2019-06-03T23:03:08+5:302019-06-03T23:03:28+5:30
कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेकडे अधिक लक्ष देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य पोहचविण्याचे काम करणे गरजेचे आहे, असे विचार साकोली तालुक्यातील सुकळी येथे रविवारी दुपारी जिल्हा काँग्रेस कमेटीची चिंतन सभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेकडे अधिक लक्ष देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य पोहचविण्याचे काम करणे गरजेचे आहे, असे विचार साकोली तालुक्यातील सुकळी येथे रविवारी दुपारी जिल्हा काँग्रेस कमेटीची चिंतन सभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी खासदार नाना पटोले म्हणाले, काँग्रेस हा गोरगरीब जनता, शेतकरी व कामगारांचा पक्ष असून मतदान प्रक्रियेतील हार जीत ही चालूच राहते, परंतु आमची लढाई ही सर्वसामान्यांसाठीची लढाई असून ती सुरुच राहणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचाच झेंडा विधानसभेवर फडकेल असा ठाम विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
पटोले यांनी कार्यकर्त्यांना पराजयाला घाबरून न जाता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने कामाला सुरुवात करण्यास सांगितले. पुन्हा एकदा सत्तेचा दावा करणाºया भाजप शिवसेना युतीला उत्तर देण्यासाठी सज्ज राहा, असा सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नाना पटोले, भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भुरे, आरोग्य सभापती प्रेम वनवे, सभापती रेखाताई वासनिक, माजी सभापती पांडे, प्रकाश पचारे, सभापती बंडू ढेंगे, लाखनीचे सभापती खुशाल गिदमारे, माणिकराव ब्राम्हणकर, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, प्यारेलाल वाघमारे, अशोक कापगते, माजी सभापती नीळकंठ टेकाम, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, हंसाताई खोब्रागडे, प्रभू मोहतुरे, शंकर राऊत, अमर रगडे, शंकर तेलमासरे, साकोली शहर अध्यक्ष अश्विन नशिने, भूमेश्वर महावाडे, नंदकिशोर समरीत, साकोली तालुका अध्यक्ष विशाल तिरपुडे, सुनील गिºहेपुंजे, मनोहर उरकुडकर, रणभीर कैलाश भगत, सुरेश मेश्राम, धनंजय तिरपुडे, धनराज साठवणे, दिलीप सुरकर, अजय गडकरी, मकसुद पटेल, मुकुंद साखरकर, मंगेश निखाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सर्वानुमते राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे, असा ठराव जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी मांडला. त्यावेळी सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.
संचालन मार्कंड भेंडारकर यांनी केले. यावेळी सभेसाठी जिल्ह्यातून, तालुक्यातून अनेक पदाधिकारी उपस्थित राहिले. सभेला नूतन भोले, संतोष कापसे, गणेश लिमजे, छाया पटेल, वेंदांता गंगभोज, करुणा धुर्वे, नैनश्री येळणे, लता मालाधारी, सीमा बडवाईक, वर्षा बारई, अंजिरा चुटे, करुणा वालोदे, मनीषा भांडारकर, प्रिया खंडाते, शमीम पठाण, भरत लिमजे, भावना शेंडे, निर्मला कापगते, मीरा उरकुडकर, कुंदा वैद्य, कुंदना वाढई, आनंद बिसेन, कान्हा बावनकर, मनोहर भिवगडे, सुनील सिडाम, खुशाल पुस्तोडे, प्रकाश बागडे, जयपाल जनबंखू, लखनलाल चौरे, ओमकार कापगते, मनोहर डोंगरे, उत्तम भागडकर, योगीराज भेंडारकर, ओमप्रकाश गायकवाड, विनायक देशमुख, प्रकाश प्कुरंजेकर, वंदना मेश्राम, आनंदराव पिल्लारे, छबीलाल वासनिक, उमेश कठाणे, राजेश हटवार, विकास भुरे, मनोज देशमुख, अझहर पाशा, आजीम खान, प्रशांत कापगते, जीवन भजनकर, डॉ.चंद्रकांत निंबार्ते,प्रकाश वाघाये, कैलाश, नरेश करंजेकर, अरुण गुजर, दीपक मेंढे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.