केंद्र शासनाविरूद्ध काँग्रेसची निदर्शने
By admin | Published: April 9, 2016 12:23 AM2016-04-09T00:23:31+5:302016-04-09T00:23:31+5:30
उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशसारख्या काँग्रेसशासित राज्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या करुन राष्ट्रपती राजवट लागू केले.
भंडारा : उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशसारख्या काँग्रेसशासित राज्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या करुन राष्ट्रपती राजवट लागू केले. याचा निषेधार्थ गुरुवारी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद चौक, भंडारा येथे निदर्शने करण्यात आली.
प्रदेश निरीक्षक हुकूमचंद आमधरे, जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी आमदार आनंदराव वंजारी, सेवक वाघाये, अनिल बावनकर, मधुकर लिचडे, सिमा भुरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पैदल मार्च काढण्यात आला. नारेबाजी करुन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला.
यावेळी आमधरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाने जनतेला दाखविलेली स्वप्ने खोटी ठरली आहेत. देशभरातील जनतेचा भ्रमनिराश झाला आहे. भाजप सरकारची धोरणे व निर्णय सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, दलित, अल्पसंख्याक व गोरगरीबांच्या विरोधात असल्याचेही वारंवार दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या या लोकशाहीविरोधी धोरणे आणि हुकूमशाही मानसिकतेच्या लोकांचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, सभापती विनायक बुरडे, नारायण तितीरमारे, मनोहर सिंगनजुडे, चुन्नीलाल ठवकर, राजकुमार मेश्राम, प्रेमसागर गणवीर, शिशिर वंजारी, मोहाडीच्या नगराध्यक्षा स्वाती निमजे, लाखनीच्या नगराध्यक्षा कल्पना भिवगडे, शमीम शेख, प्रसन्न चकोले, अनिक जमा, अजय गडकरी, डॉ.विनोद भोयर, भूषण टेंभुर्णे, ज्ञानेश्वर रहांगडाले, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, प्रभु मोहतुरे, अमर रगडे, शंकर राऊत, सुनील गिऱ्हेपुंजे, नंदू समरीत, भुमेश्वर महावाडे, अश्विन नशिने, बाळू कायते, प्यारेलाल वाघमारे, प्रेमदास वनवे, होमराज कापगते, खेमराज पंचबुध्दे, रमेश डोंगरे, हेमंत कोरे, मनोहर राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)