काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:05 PM2018-05-06T22:05:13+5:302018-05-06T22:05:13+5:30

राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे भाजपचे नगराध्यक्ष व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्यावर पोलीस प्रशासनाद्वारे त्यांच्या वर गुन्हे दाखल केले गेले नाहीत. त्यामुळे शनिवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात शहर काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले.

Congress's stance agitation | काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देनिवेदन : प्रकरण राष्ट्रध्वजाच्या अवमाननेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे भाजपचे नगराध्यक्ष व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्यावर पोलीस प्रशासनाद्वारे त्यांच्या वर गुन्हे दाखल केले गेले नाहीत. त्यामुळे शनिवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात शहर काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले.
यावेळी वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सरकारी अभियोक्ता यांच्याकडून अभिप्राय मागविले आहे. अभिप्राय प्राप्त होताच कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. यासंदर्भात अभिप्रायची गरज नसून प्रथम दर्शनी गुन्हा घडलेला आहे. ७ तारखेच्या आत कारवाई न झाल्यास ८ मे रोजी पोलीस ठाणे समोर कॅन्डल घेऊन उभे राहू. तसेच राष्ट्रध्वजाचा अपमान करणाºया नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्यावर गुन्हा नोंदवून कडक शिक्षा व्हावी, अशीपुन्हा मागणी करू असा इशाराही देण्यात आला. जिल्हा महासचिव शिशिर वंजारी, तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, महासचिव मनोज बागडे, सुरेश गोन्नाडे, पवन वंजारी, विनित देशपांडे, भावना शेन्डे, प्रिया खंडारे, रजनी मुळे, सुलभा हटवार, शमीम पठाण, भारती लिमजे, युवक सुहास गजभिये, पराग खोब्रागडे, प्रवीण भोंदे, सचिन हुमने, मोहीश कुरैशी, श्रीकांत बन्सोड, चंदु चाचेरे, काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Congress's stance agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.