खेडेगाव शहराशी जोडणार -पटोले
By admin | Published: May 15, 2017 12:40 AM2017-05-15T00:40:45+5:302017-05-15T00:40:45+5:30
खेडेगावात लघुउद्योग व अत्याधुनिक शेतीतून शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार आर्थीक विकास साधत आहेत, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : खेडेगावात लघुउद्योग व अत्याधुनिक शेतीतून शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार आर्थीक विकास साधत आहेत, परंतु खेडेगाव व शहरांना जोडणारे रस्ते अडचणीचे ठरतात, हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातील खेडेगाव शहराशी जोडणार असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
भागडी येथे चिचोली-भागडी रस्त्यावर मोठ्या पुलाच्या भूमीपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, आमदार राजेश काशिवार, नगराध्यक्ष निलिमा हुमणे, सभापती मंगला बगमारे, पंचायत समिती सदस्या तृप्ती मातेरे, जि.प.सदस्य मनोहर राऊत, सरपंच कोमल नाकतोडे, दिपलता डोंगरे, कार्यकारी अभियंता उके, सहायक अभियंता राऊत, अभियंता जुगादे, ताराचंद मातेरे, नूतन कांबळे, नगर पंचायत उपाध्यक्ष नरेश खरकाटे, नगर पंचायत सदस्य विनोद ठाकरे, हरीश बगमारे, प्रल्हाद देशमुख, रामचंद्र राऊत, विलास हुमाणे, रज्जू पठाण, राजू कोट्टेवार, मनोज चुटे, कानिराम मातेरे, उपस्थित होते.
खासदार पटोले म्हणाले, गाव तिथे रस्ता, नदीवर पूल ही आपली प्राथमिकता आहे. तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक गावातील व्यक्ती कमी वेळात व कमी खर्चात पोहोचावा, यासाठी केंद्रातून जास्तीत जास्त निधी खेचुन आणणार आहे.
आमदार काशिवार म्हणाले, लाखांदूर तालुक्यातील सर्व रस्ते मजबूत करणार असून टप्या-टप्याने रस्ते विकासाची कामे घेत आहोत. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाठी तालुक्याला निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार असून तालुक्यातील सर्व कच्चे रस्ते मजबूत करणार आहे.सदर चिंचोली-भागडी पुल, व धर्मापुरी-बोथली हे दोन पूल दुपदरी असून १९० मीटर लांब राहणार आहे. जवळपास १० कोटींचा निधी खर्च करून या पुलाचे बांधकाम होणार आहे. तत्पूर्वी सरपंच नाकतोडे यांनी प्रास्ताविक मध्ये गावातील समस्या मांडल्या, आभार ताराचंद यांनी मानले.