सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 06:00 AM2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:40+5:30

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला शिका, संकटे तुडविण्यासाठी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते कृतीत उतरवा. या समग्र विचारांच्यासाठी विवेकाची गरज आहे आणि हे विवेक तथागत बुद्धाने व आपल्या संविधानाने शिकवला. अर्थात सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

Conscience is better than truth | सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो

सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो

Next
ठळक मुद्देसंजय देशमुख : ठाणा येथे भारतीय संविधान दिन समारोह

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : गावातील तसेच देशातील विचारात विसंगती असल्यास काहीही पारायण करतो. त्यात जर संविधानाचे पारायण केले, तर शांती, समृद्धी नांदेल. आजची तरूण पिढी काही अंशी जातीभेद मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला शिका, संकटे तुडविण्यासाठी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते कृतीत उतरवा. या समग्र विचारांच्यासाठी विवेकाची गरज आहे आणि हे विवेक तथागत बुद्धाने व आपल्या संविधानाने शिकवला. अर्थात सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
ठाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा व भीमगिरी बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटीद्वारा आयोजित भारतीय संविधान दिन समारोहाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष पी.एस. खोब्रागडे हे होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव मनीष कोठारी, बार्टी प्रकल्प अधिकारी गोडबोले, सरपंच सुषमा पवार, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळाचे मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मधुकर मेश्राम, माजी सैनिक सुभेदार रामचंद्र कारेमोरे, उपसरपंच विनोद तिरपुडे, ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल भोंगाडे उपस्थित होते.
मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे म्हणाले, जन्माला येणारा बाळ सुदृढ असावा, असे मातेला वाटते. त्याच प्रकारे बाळाला एकसुत्रतेत बांधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे समग्र विकासासाठी संविधानाच्या रूपाने लोकशाहीला मिळालेली संजीवनी आहे. परंतू यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.
सरपंच सुषमा पवार म्हणाल्या, भौतीक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव व मोलाचे कार्य हे संविधानामुळे होते. ती दैनिक जीवनशैली आहे. जसे आपण गुरूचे आदर करतो तसेच संविधानाचे आदर राखणे काळाची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात पी.एस. खोब्रागडे म्हणाले की, माणसाला माणुसकीने जगण्याचे शिकविले ते डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने. क्षेत्रिय वतनदारीचे राजे हे सिमित क्षेत्राचे असतात. डॉ. बाबासाहेब हे भारताचे किंबहुना जगाचे राजे आहेत. सामाजिक व आर्थिक दरी वाढत आहे. यासाठी उच्च शिक्षित बना. दुसऱ्याला वाईट लेखू नका. प्रेमाची, समतेची भाषा हाच धम्माचा मार्ग खरी दिशा आहे. मुलं प्रज्ञावंत झाली तर आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील. ज्या घरात धम्म व संविधान आहे. त्या घरात सुख समृद्धी लाभेल. यावेळी संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.
आतंकवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली दिली.
भिमगिरी बुद्धीष्ट वेल्फेअरचे मदनपाल गोस्वामी व ग्रामपंचायत ठाणाचे सरपंच सुषमा पवार यांना हृदय गोडबोलेद्वारे भारताचे इंग्रजीत संविधान वितरित केले.
प्रास्ताविक मदनपाल गोस्वामी यांनी केले. संचालन प्रिती रामटेके यांनी केले. आभत्तर अनमोल मेश्राम यांनी केले.

Web Title: Conscience is better than truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.