रासायनिक खताच्या अतिवापराने जमिनीच्या पोतावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 09:54 PM2019-03-23T21:54:38+5:302019-03-23T21:55:34+5:30
जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
सिहोरा येथील बाजार चौक परिसरात आयोजित कायदेविषयक, सेंद्रीय शेती, रासायनिक खत आणि दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश न्या. संजय देशमुख होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव कोठारी, डॉ. संजय एकापुरे (गणेशपूर), अॅड. प्रशांत मेश्राम, रडार शेतकरी उत्पादकचे संचालक अभय ठेंगे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, वाहनी येथील सरपंच गडीराम बांडेबुचे, केंद्रीय नोटरी अॅड. विजय पारधी, पेसेज कॅरिअर बेस्ट डील कंपनीचे संचालक गौरीशंकर डोहके, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक ओमकार तुरकर, शेखर तिवारी, संतोष गाढवे, जयशंकर घटारे, कलीम शेख, चंद्रशेखर डोहळे, राकेश मिश्रा, नरेश ढोमणे उपस्थित होते.
सिहोरा परिसरातील ४७ गावात असणाऱ्या शेतकऱ्यांना जैविक आणि सेंद्रिय शेतीमुळे विषयी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या शिवाय शेतकऱ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिराचे आयोजन करण्यात आले असता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. या मेळाव्यात शेतकऱ्यांना रासायनिक खतामुळे जमिनीतील पोत आणि जैविक घटक नष्ठ होत असल्याची माहिती देण्यात आली.
यामुळे उत्पादनात निरंतर घट होत आहे. याशिवाय शेतीवर दुष्परिणाम होत असल्याचे उपस्थित असलेल्या मार्गदर्शक अतिथींनी यावेळी आर्वजून सांगितले. दरवर्षी सातत्याने शेती उत्पादनात घट अनुभवणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व अनुमती तज्ज्ञांना सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जयशंकर घटारे यांनी केले.