निसर्गाचे संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:37+5:302021-07-29T04:34:37+5:30

भंडारा : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वतोपरी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ओ.बी. चोले यांनी केले. इंदुताई ...

Conservation of nature needs time | निसर्गाचे संवर्धन काळाची गरज

निसर्गाचे संवर्धन काळाची गरज

Next

भंडारा : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वतोपरी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ओ.बी. चोले यांनी केले. इंदुताई मेमोरियल हायस्कूल तथा कनिष्ठ कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय हरदोली येथे जागतिक निसर्ग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्राचार्य ओ.बी. चोले यांच्या अध्यक्षतेत, प्रमुख पाहुणे म्हणून खेमचंद हटवार, अनाथ पाल, वैद्य जे.आर. राऊत, त्रिशरण मेश्राम, संजय जांभूळकर, गोपाल घोती, प्रतीक राठोड, प्रा. एम.एम. सिंगनजुडे, प्रा. झोडे, नरेश चव्हाण, माधुरी मेश्राम, किशोर शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य चोले म्हणाले, निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्षे लागतात, तरीपण मानव विकासाच्या नावाखाली आपल्या सुखसोयीसाठी या निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचा वारेमाप उपयोग करत असल्याने ही संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मानवामध्ये आधुनिक व सुखासीन जीवनशैली रुजू लागली असून मानव आपल्या सुखासाठी निसर्गातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वारेमाप उपयोग करत असल्याने एकेकाळी घनदाट असलेली जंगले ओसाड पडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खनिज संपत्तीचा अनावश्यक वापर करण्यात येत असून यामुळे पर्यावरण प्रदूषित होत असल्याने सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत असून अनेक दुर्धर आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे सजीव सृष्टीचे जीवन संकटात आले आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करण्याचा कृती संकल्प करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ओ.बी. चोले यांनी कार्यक्रमप्रसंगी केले. संचालन खेमचंद हटवार, तर आभार प्रा. सिंगनजुडे यांनी मानले.

Web Title: Conservation of nature needs time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.