मृताच्या कुटुंबीयांचे नाना पटोले यांनी केले सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:05 PM2017-09-02T23:05:28+5:302017-09-02T23:05:50+5:30
भंडारा तालुक्याअंतर्गत येणाºया लावेश्वर येथील चिंतामण काळे हा शेतकरी स्वत:च्या शेतावर म्हशी चारण्याकरिता गेला असता विद्युत करंटने मृत्यु झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा तालुक्याअंतर्गत येणाºया लावेश्वर येथील चिंतामण काळे हा शेतकरी स्वत:च्या शेतावर म्हशी चारण्याकरिता गेला असता विद्युत करंटने मृत्यु झाला. त्या पीडीत कुटुंबाची खासदार नाना पटोले यांनी
शुक्रवारला मृत शेतकºयाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयाला सांत्वना दिली.
लावेश्वर येथील शेतकरी चिंतामण काळे हा शेतीसोबत जोडधंदा म्हणून पाळीव जनावरे पाळत होता. शेतात म्हशी चारण्याकरिता नेत होता. त्याच्या शेतातूनच विद्युत लाईन गेली असून त्या विद्युत लाईनचे दोन तार त्याच्या पडीत असलेल्या जमिनीवर पडले होते. त्या तारेचा स्पर्श जमिनीतील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात झाला होता. पाण्याच्या डबक्याजवळून सदर शेतकºयांचे नेहमीच जाणे येणे होते. आपल्या घरच्या म्हशी घेऊन जात असताना विद्युत लाईनच्या पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झालेल्या पाण्याच्या डबक्याजवळ आला व सोबत त्याच्या म्हशीचा कळपही आला होता. तारेचा स्पर्श होताच त्याच पाच म्हशी, दोन बछडे विद्युत तारेच्या करंटमुळे त्यात शेतकºयांचा मृत्यू झाला.
घरचा कुटुंबातील कमावता व्यक्ती व पाच म्हशीसह दोन बछडेही मृत्युमुखी पडल्याने सदर शेतकºयांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. मृतक शेतकºयाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियाला सांत्वना भेट दिली. यावेळी त्यांनी कुटुंबियांना योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन खासदार नाना पटोले यांनी दिले. यावेळी ठाणेदार सुरेश ढोबळे, तहसीलदार पवार, महाराष्ट्र विद्युत कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत पावलेल्या शेतकºयाच्या घरी जाऊन कुटुंबियांना सांत्वना भेट दिली. लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत देण्याचे आश्वासन कुटुंबियांना दिले.