संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:52 PM2018-03-27T22:52:37+5:302018-03-27T22:52:37+5:30
कोष्टी हा हलबांचा धंदा असल्याचा इतिहास हाय कोर्टात मान्य झाला. जाती दाखला अन्यायकारक अवैध ठरविल्यानंतर उच्च न्यायालयाने नोकरीला संरक्षित केले, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध भाजपा सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन हलबांचा विश्वासघात केला, यामुळे विदर्भात भाजपा सरकार विरोधात आक्रोश वाढत आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : कोष्टी हा हलबांचा धंदा असल्याचा इतिहास हाय कोर्टात मान्य झाला. जाती दाखला अन्यायकारक अवैध ठरविल्यानंतर उच्च न्यायालयाने नोकरीला संरक्षित केले, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध भाजपा सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन हलबांचा विश्वासघात केला, यामुळे विदर्भात भाजपा सरकार विरोधात आक्रोश वाढत आहे. म्हणून संविधानाचा सन्मान करून भाजपा सरकारने हलबांना न्याय दिला पाहिजे, असे प्रतिपादन आदिमच्या मार्गदर्शिका अॅड. नंदा पराते यांनी केले.
राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या माध्यमाने कर्मचारी व अधिकारी यांचा मेळावा तुमसर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर धकाते होते. मंचावर आदिमच्या मार्गदर्शिका अॅड. नंदा पराते या उपस्थित होत्या. अतिथी म्हणून धनंजय धापोडकर, ओमप्रकाश पाठराबे, मनोहर हेडाऊ, किरण बारापात्रे, आशिष पात्रे, सौरभ कुंभारे, यादोराव कुंभारे, मोरेश्वर निनावे, महेश लिमजे, किर्ती कुंभारे, अरुणा श्रीपाद, शोभा बुरडे, गीता बोकडे हे होते.
अॅड. नंदा पराते म्हणाल्या संविधानानुसार दलित, आदिवासी, ओबीसी यांना आरक्षण मिळाले होते. तसेच हलबा, हलबी जमातीचा घटना यादीमध्ये समावेश केला आहे. सरकारच्या सक्षम अधिकाऱ्यांनी लाखो जाती दाखले मागासवर्गीयांना दिलेत. संविधान यादीमध्ये जाती, जमातींना आरक्षणाचा लाभ देणे सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे. संविधान यादीतील हलबा, हलबी जमातींचा हिंदू धर्माच्या नावाखाली आणि कोष्टी धंद्याच्या नावाने अन्याय होऊ देणार नाही, असे भाजपा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सरकार महाराष्ट्रात सतेत आल्यास तीन महिन्यात जी.आर. काढून हलबा बांधवांना न्याय देऊ असे आश्वासन दिले होते, परंतु जात तपासणी समिती भाजपा सरकारच्या इशाºयावर हलबांचे जाती दाखले खोटे ठरवित आहे. सक्षम अधिकाºयाने निर्गमित केलेले जाती दाखले खोटे कसे असू शकतात, भाजपा नेत्याचा आश्वासनावर विश्वास ठेवून २०-२२ आमदार हलबा बांधवांनी निवडून दिलेत. भाजपा सत्तेवर आल्यानंतर संविधानाचा सन्मान करण्याएवजी हलबांशी विश्वासघात करत आहे. या जनजागृती मेळाव्यात धनंजय धापोडकर यांनी भाजपा सरकारच्या कृती व चर्चा संबंधी म्हणाले आश्वासनाशिवाय ही भाजपा सरकार या जनजागृती मेळाव्यात धनंजय धापोडकर यांनी भाजपा सरकारच्या कृती व चर्चा संबंधी म्हणाले आश्वासनाशिवाय ही भाजपा सरकार कोणत्याही प्रकारे न्याय देण्याची कृती दाखवत नाही, यामुळे सर्व समाजात असंतोष आहे.जाती दाखल्यासाठी १९७६ च्या आधीची पुराव्याची अट असताना सुद्धा त्रास देणे सुरू आहे.
या मेळाव्यात आशिष पात्रे व मनोहर हेडाऊ यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर १० एप्रिलला मोर्चा काढत असून या मोर्च्यात सर्व हलबा समाज बांधवांना सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मेळाव्यासाठी महेश लिमजे, प्रकाश कुंभारे, महेंद्र कुंभारे, किर्ती कुंभारे, मीनल लिमजे, मनिषा खेताडे, यमुना निनावे, शोभा निखारे, पल्लवी कुंभारे यांनी सहकार्य केले. शंतनू निखारे यांनी आभार मानले.