रोहयो योजनेतील पुलाचे बांधकाम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:17 PM2018-03-11T22:17:49+5:302018-03-11T22:17:49+5:30
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. निधी खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
चांदपुर गावात शेतकऱ्यांचे अनुदान राशी वर तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने डल्ला मारले असतांना पुन्हा पांदन रस्त्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गावात सन २०१६ सत्रात डी.पी. ते आंब्याचे झाडपर्यंत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत पांदन रस्त्याचे कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याचे कामे करण्यासाठी ३ लाख ५३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पांदन रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम करण्यात आले असले तरी बाळा फडणवीस यांचे शेत शिवार नजिक पुलाचे बांधकाम करतांना फक्त पाईप घालण्यात आले आहे. या पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. पांदन रस्त्याचे प्राप्त निधीची उचल करण्यात आली आहे. यात १ लाख २५ हजार रुपयांचा निधी असुन ५ हजार रुपयाचे मस्टर काढण्यात आले आहे. दरम्यान तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने अर्धवट कार्य ठेवल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
या पांदन रस्त्यावर मुरुमाचा थांगपत्ता नाही. फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याने गावकऱ्यांच्या भुवय्या उंचाविल्या आहे. या गावात शेतकऱ्यांचे योजनांचा बोजवारा वाजविण्यात आला असल्याने न्याय देतांना अडचणी येत आहेत. तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाचा फटका विद्यमान प्रशासनाला बसत आहे. लाभार्थ्यांचे याच प्रशासनावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. ज्या गैरव्यवहारात या प्रशासनाची भुमिका नाही. यामुळे खोट्या आरोपाची जबाबदारी स्विकारण्यात येणार नाही. अशी भुमिका ग्राम पंचायत प्रशासनाने घेतली आहे. यामुळे गावात रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाची चौकशी करुन दोषी पदाधिकारी तथा कर्मचारी विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पांदण रस्त्याचे पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले असून शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. रोहयो योजनेची चौकशी झाली पाहिजे.
- उर्मिला लांजे,
सरपंच चांदपूर