‘त्या’ प्रभागात सिमेंट रस्ते, नालीचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:30 AM2021-02-08T04:30:52+5:302021-02-08T04:30:52+5:30

०७ लोक ११ के तुमसर : स्थानिक प्रभाग क्र.९ श्रीरामनगरात मागील सात वर्षांपासून वास्तव्यास असून, नियमित घरकर भरत आहेत, ...

Construction of cement roads, drains in ‘that’ ward | ‘त्या’ प्रभागात सिमेंट रस्ते, नालीचे बांधकाम करा

‘त्या’ प्रभागात सिमेंट रस्ते, नालीचे बांधकाम करा

googlenewsNext

०७ लोक ११ के

तुमसर : स्थानिक प्रभाग क्र.९ श्रीरामनगरात मागील सात वर्षांपासून वास्तव्यास असून, नियमित घरकर भरत आहेत, मात्र अजूनपर्यंत नगर परिषदेने मूलभूत सुविधा पुरविले नाही परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणी ना समोर जावे लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तत्काळ नागरी सुविधा योजनेतून प्रभाग क्र. ९ मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना देण्यात आले

श्रीरामनगरात गत सात वर्षांपासून वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र अजूनपर्यंत रस्त्याचे साधे खडीकरणदेखील झाले नाही. तसेच नालीचे बांधकाम झाले नाही परिणामी घरातील सांडपाणी रस्त्यावर साचला राहतो त्यामुळे दुचाकी चारचाकी व पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करताना कमालीचा त्रास सहन तर करावा लागतोच आहे. त्याचबरोबर सांडपाणी साचून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी वातावरण दूषित झाले आहे अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम झाले असून, नगर परिषदेने तत्काळ नगर विकास योजनेतून बागडे यांच्या घरापासून बोन्द्रे यांच्या घरापर्यंत २३० मीटरचा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देतेवेळी नगरसेवक बाळा ठाकूर, शिव बोरकर, मुरलीधर रहांगडाले, चंद्रशेखर बागडे, मुकेश गेडाम, नीलेश उईके, मुकेश वरकडे, तुळशीराम वरकडे, अनंत जायभाये, शिवलाल भगत, विजय बोन्द्रे, मोरेश ठाकरे, विकास आराम, चैतराम पुंडे, पद्माकर रहांगडाले आदी रहिवासी उपस्थित होते.

Web Title: Construction of cement roads, drains in ‘that’ ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.