दलित वस्ती योजनेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By admin | Published: February 17, 2017 12:40 AM2017-02-17T00:40:05+5:302017-02-17T00:40:05+5:30
तालुक्यातील विर्शी येथील दलित वस्ती सुधार बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असून या प्रकरणातील सखोल चौकशी करून
चौकशीची मागणी : गावकऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार
साकोली : तालुक्यातील विर्शी येथील दलित वस्ती सुधार बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असून या प्रकरणातील सखोल चौकशी करून दोषीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांना केली आहे.
या तक्रारीप्रमाणे सण २०१६ मध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत १० लक्ष ९८ हजार ३४ हजार रूपयाचे अंदाजपत्रक मंजरु झाले. सदर बांधकाम ग्रामपंचायतच्या नावे दाखवून पूर्ण करताना निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. अंदाजपत्रकाचा विचार न करता मनमर्जीने वाट्टेल तसे नागमोडी आकाराचे नाली बांधकाम व अल्प काँक्रेटचे रस्ते तयार करण्यात आले.
तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, सदर बांधकाम जि.प. सदस्या मंदा गणवीर यांनी स्वत:चे वैयक्तीक कंत्राटदार व साहित्य पुरवठाधारक यांना सोबत घेवून केले. अल्पप्रमाणात लोखंड व काँक्रीट, माती मिश्रीत रेती व गिट्टीचा वापर करून पुर्ण केलयाचे आढळून आले. गणवीर यांनी २६ जानेवारीच्या ग्रामसेवक समस्त ग्रामवासीयांसमोर केलेली आहे, असेही या तक्रारीत नमुद आहे.
तसेच सरपंच डॉ. निंबराज कापगते यांची सुद्धा सदर कामास मुकसंमती असल्याचे बोलले जाते. कुढल्याही बांधकाम साहीत्यसंबंधी अथवा गटविकास अधिकारी साकोली यांनी १६ डिसेंबर २०१६ ला केलेल्या सुचनाचे पालन करू शकले नाही. उलट ग्रामसेवक यांना जि.प. सदस्य यांच्या घरी बोलावून ‘आमचे पैसे काढा बाकी मी सांभाळून घेईन’ असे सांगतात. त्यामुळे या सपूर्ण बांधकामाची योग्य ती चौकशी करून दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी व बांधकाम अंदाजपत्रकाप्रमाणे कोणतेही देयके अदा करण्यात येवू नये असे नमुद आहे.
कार्यकारी अभियंता भंडारा, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग साकोली व गटविकास अधिकारी साकोली यांना देण्यात आले आहे. या तक्रारीवर गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)