सोंड्या येथे नालीचे बांधकाम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:25 PM2018-04-15T23:25:21+5:302018-04-15T23:25:21+5:30
सोंड्या गावाचे हद्दीत असणाऱ्या तलावाचे खोलीकरण करण् यात येत असले तरी माती अस्तव्यस्त घालण्यात आली आहे. नालीचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत आहे. चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सोंड्या गावाचे हद्दीत असणाऱ्या तलावाचे खोलीकरण करण् यात येत असले तरी माती अस्तव्यस्त घालण्यात आली आहे. नालीचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत आहे. चौकशी करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.
सिहोरा परिसरात जलयुक्त शिवार व पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत तलावाचे कामे करण्यात येत आहेत. ही कामे वादाचे भोवºयात अडकली आहेत. सोंड्या गावाचे हद्दीत तलावाचे खोलीकरण करण्यात आले असले तरी मातीची विल्हेवाट लावताना नियोजन नाही. तलावात पाण्याचा लोंढा येणारे जागेवर ही माती अस्तव्यस्त घालण्यात आली आहे.
यामुळे पावसाळ्यात पुन्हा माती तलावात जमा होणार आहे. तलावात मातीचे खोदकाम योग्य दिशेने करण्यात आले नसल्याने पैशाची नासाडी करण्यात येत आहे. याच तलावाचे शेजारी सिमेंट काँक्रीटचे नाली सायपनचे बांधकाम करण्यात येत आहे. यात सिमेंट व लोखंड चे प्रमाण अल्प आहे. यामुळे निकृष्ट बांधकाम करण्यात येत असल्याने नालीचे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तलाव आणि नालीचे बांधकाम सातपुडा पर्वत व जंगलाचे शेजारी करण्यात येत आहे. यामुळे यंत्रणेचे नियंत्रण नाही. तलावाचे पाळीचे मजबुतीकरणासाठी माती असताना शेतात विल्हेवाट लावण्यात येत असल्याने गावकरी चौकशीकरिता ओरड करीत आहे. परंतु कुणी ऐकत नाही असा आरोप आहे.