धान्य गोदामांचे बांधकाम वर्षभरापासून थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:40 AM2021-09-12T04:40:23+5:302021-09-12T04:40:23+5:30
धान उत्पादनात अग्रेसर लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप व रबी हंगामात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धानाची शेतकऱ्यांकडून ...
धान उत्पादनात अग्रेसर लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप व रबी हंगामात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धानाची शेतकऱ्यांकडून शासनाच्या आधारभूत केंद्रांतर्गत धान खरेदी देखील केली जात आहे. राईस मिलधारकांकडून भरडाईसाठी धानाची उचल होऊन तांदूळ लाखांदूरातील सरकारी गोदामांत ठेवला जातो. मात्र येथील शासकीय गोदामाची क्षमता केवळ १५०० मेट्रिक टन आहे. त्यामुळे राईस मिलधारकांकडून अत्यंत संथगतीने धानाची उचल होते. परिणामी आधारभूत खरेदी प्रक्रियेत विविध अडचणी निर्माण होतात.
या अडचणीवर मात करण्यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या पुढाकारात गत वर्षी २७ ऑक्टोबर रोजी शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत लाखांदूर येथील जिरोबा परिसरात गोदामाच्या बांधकामासाठी २३ कोटी ६७ लाख ६८ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. निधी मंजूर होऊन वर्ष लोटत असताना अद्यापही या गोदामांचे बांधकाम सुरू झाले नाही. गोदामांचे बांधकाम केव्हा होणार, असा सवाल केला जात आहे.