केसलवाडा येथील ऑक्सिजन प्लांटचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:56+5:302021-05-18T04:36:56+5:30
वर्तमान परिस्थितीत देश आणि जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जात आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता ही जास्त जाणवली आणि ...
वर्तमान परिस्थितीत देश आणि जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जात आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता ही जास्त जाणवली आणि अनेक लोकांना प्राणवायूची गरज पडली. त्यामुळे प्राणवायू पाहिजे त्या क्षमतेमध्ये तयार करणे शक्य नव्हते. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुढेही आपल्याला या गोष्टीची गरज पडणार आहे. त्या दृष्टीने भविष्यकाळामध्ये ही सोय आपल्याकडे असली पाहिजे आणि म्हणून साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यांत प्रत्येकी एक ऑक्सिजन प्लांट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आले. त्याचे बांधकाम देखील युद्धस्तरावर सुरू आहे. लवकरच सदर तिन्ही प्रकल्प पूर्णत्वास येतील आणि त्यांचा वापर सुरू होईल. लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथे या ऑक्सिजन प्लांटचे बांधकाम सुरू असून, साकोली व लाखांदूर येथील ऑक्सिजन प्लांटसुद्धा लवकरच पूर्णत्वास येणार आहे आणि याचा फायदा स्थानिक दवाखान्यासह रुग्णांना देखील होणार आहे.