वैनगंगा नदीवरील दुसऱ्या पूलाचे बांधकाम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:51 AM2019-06-08T00:51:49+5:302019-06-08T00:52:27+5:30

तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवर दुसºया पुलाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन नऊ ते दहा महिने झाले. दरम्यान मुरुम, रेती व सध्या पाणीटंचाईने कामाची गती मंदावल्याचे चित्र दिसत आहे.

The construction of the second corridor on the Wainganga River Softly | वैनगंगा नदीवरील दुसऱ्या पूलाचे बांधकाम संथगतीने

वैनगंगा नदीवरील दुसऱ्या पूलाचे बांधकाम संथगतीने

Next
ठळक मुद्देपाणीटंचाईचा फटका : महामार्गाच्या कामांची गुणवत्ता व दर्जावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवर दुसºया पुलाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन नऊ ते दहा महिने झाले. दरम्यान मुरुम, रेती व सध्या पाणीटंचाईने कामाची गती मंदावल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची गुणवत्ता व दर्जावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मनसर-रामटेक - तुमसर व गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन तशी घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात नऊ ते दहा महिन्यापूर्वीच कामाला सुरुवात करण्यात आली. रस्ता बांधकामात अनेक अडथळे निर्माण झाले. सिमेंट रस्ता बांधकामापूर्वी दुपदरीकरण रस्ता खोदकाम व त्यात मुरुमाचा भराव ही कामे हाती घेण्यात आली. याकरिता रस्ताशेजारील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. मुरुम व वृक्षतोड प्रकरणी तक्रारी करण्यात आल्या. त्यात मुरुमाची चौकशी सध्या सुरु आहे. सिमेंट रस्ता बांधकामाकरिता रेतीची मोठी गरज होती. रस्ता बांधकामात चोरट्या रेतीचा वापर करण्यात आल्याचे प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. तुमसर तालुक्यात रेती घाट लिलाव नसतांना बांधकाम कुठल्या रेतीचा वापर करण्यात आला. याबाबत सर्वच गोंधळात आहेत. नियमांना डावलून कामे सुरु असताना त्याची दखल केवळ हायवे अ‍ॅथॉरिटी घेईल, असे अधिकारी खाजगीत बोलत आहे. पावसाळ्यात पर्यायी रस्त्यावर चिखल, पाणी साचून रस्ता अधिक धोकादायक होणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दुसरा पूल उपयोगी
वैनगंगा नदीवर माडगी शिवारात मागील ५० वर्षापूर्वी पूल तयार करण्यात आला. स्थापत्य शास्त्राचा तो उत्कृष्ठ नमुना आहे. प्रसिध्द वास्तु तज्ञ खरे अ‍ॅन्ड तारकुंडे यांनी तयार केला होता. याच पुलाच्या समांतर राष्ट्रीय महामार्गाच्या वैनगंगा नदी पूलावर दुसरा पूल बांधकामाला सुरुवात करण्यात आली. किमान दोन ते तीन वर्षे पूल बांधकामाला लागणार असल्याची माहिती आहे. पूलाचे बांधकाम सध्या संथगतीने सुरु आहे. अशीच स्थिती राहिली तर किमान पाच ते सहा वर्षे पूल बांधकामाला लागण्याची शक्यता येथे वर्तविण्यात येत आहे.

Web Title: The construction of the second corridor on the Wainganga River Softly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.