पवनारा येथे नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम
By Admin | Published: October 6, 2016 12:54 AM2016-10-06T00:54:19+5:302016-10-06T00:54:19+5:30
तुमसर तालुक्यातील पवनारा येथे 'पाणी अडवा पाणी जिरवा' शासनाच्या उपक्रमा अन्तर्गत पंचायत समिती ..
पवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा येथे 'पाणी अडवा पाणी जिरवा' शासनाच्या उपक्रमा अन्तर्गत पंचायत समिती तुमसर येथील अधिकारी,ग्रामसेवक संघटना व गांवकरी यांच्या लोकसहभागातून नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.
‘पाणी हे जीवन आहे' त्याचे योग्य जतन करणे ही काळाची गरज आहे. पाणी राष्ट्रीय संपत्ति आहे. याबाद जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले यांनी मार्गदर्शन करुण पाण्याचे महत्व पटवून दिले. वनराई बंधारयापासून शेतीला सिंचन ,गुरांना पिण्याकरीता पाणी व जमिनीतिल पाण्याची पातळी वाढेल अशा विविध प्रकारची माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली. व सर्वांनी ए कजुटिने लोकसहभागातुन पंधरा ते विस फुट लांबिचा बन्धारयाचे बांधकाम केले.
याप्रसंगी जि.प. सदस्य संदीप टाले, पं. स.सदस्या रेखा धुर्वे, खंडविकास अधिकारी हिरुड़कर, विस्तार अधिकारी ठवरे, घटारे, कुथे, ग्रामसेवक संघटनेचे पदधिकारी पं. स. तुमसर, सरपंच मुकेश भांबोरे, ग्रामसेवक थाटमुर्रे, तमुस अध्य्क्ष रफीक शेख, ग्राम.पं. सदस्या माला नागदेवे, कल्पना पटले, इंदु पटले, गीता नेवारे, शिक्षिका बड़गे, वंजारी, आंगनवाड़ी सेविका पंचशिला नागदेवे, रंजू परतेती, सरपंच दत्तू घोड़मारे, रायसिंग पटले, दिनेश भरडे, रविचंद्र नगरे, प्रमोद रावते, रवि नेवारे, रितेश रंगारी, लक्षमण श्रीरामे, व गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक नरेंद्र थाटमुर्रे तर आभार अश्विन डोहळे यांनी मानले. (वार्ताहर)