महिला रुग्णालयाचे बांधकाम लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:16 AM2017-12-05T00:16:15+5:302017-12-05T00:16:29+5:30
मागील अनेक वर्षांपासून आश्वासनामध्ये रखडलेल्या भंडारा येथील महिला रुग्णालयाचा प्रकल्प अखेर आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नामुळे मंजूर झाला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : मागील अनेक वर्षांपासून आश्वासनामध्ये रखडलेल्या भंडारा येथील महिला रुग्णालयाचा प्रकल्प अखेर आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नामुळे मंजूर झाला. परंतु मंजूर होवून त्यास लागणारा निधी, जागेची प्रक्रिया अडचणी रुग्णालयाच्या बांधकामाकरिता येत असल्यामुळे आमदार परिणय फुके यांनी वेळेच्या आधी रुग्णालयाचे बांधकाम लवकर सुरु कसे करता येईल, यासाठी वेळोवेळी मंत्रालयामध्ये पाठपुरावा केला.
महाराष्टÑ राज्याचे मुख्य सचिव, महाराष्टÑ सुमित मलिक यांची मंत्रालयामध्ये भेट घेऊन महिला रुग्णालयाचे बांधकामाकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली. यावर मुख्य सचिव महाराष्टÑ यांनी हायपॉवर कमिटीकडे महिला रुग्णालयाचा प्रस्ताव पाठवून हायपॉवर कमिटीकडून सादर प्रस्ताव मंजूर करुन निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मुख्य सचिव सुमित मलिक यांनी आमदार डॉ. परिणय फुके यांना दिले. त्यामुळे लवकरच बांधकामाच्या निविदा काढून कामास सुरुवात होईल असे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.