परवाना असेल तरच घ्या दारू; नाही तर विक्रेत्याला 25 हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 12:01 AM2022-11-13T00:01:10+5:302022-11-13T00:02:24+5:30

उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत, हे वास्तव आहे. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे.  परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा विक्रेत्याला किंवा बारचालकाला २५ ते ३० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो; परंतु, परवाना नसतानाही दारू पिणाऱ्यांना सर्रास दारूची विक्री केली जाते.

Consume alcohol only if licensed; If not, the seller will be fined 25 thousand | परवाना असेल तरच घ्या दारू; नाही तर विक्रेत्याला 25 हजारांचा दंड

परवाना असेल तरच घ्या दारू; नाही तर विक्रेत्याला 25 हजारांचा दंड

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार दुकानातून मद्य खरेदी करताना मद्यसेवन परवाना आवश्यक आहे. मात्र, शहर व ग्रामीण अशा दोन्ही भागात मद्यविक्रेत्यांकडून नियमावली गुंडाळून दारूची विक्री केली जात आहे. 
उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत, हे वास्तव आहे. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे.  परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा विक्रेत्याला किंवा बारचालकाला २५ ते ३० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो; परंतु, परवाना नसतानाही दारू पिणाऱ्यांना सर्रास दारूची विक्री केली जाते.

दिवसाचा परवाना पाच, तर वर्षाचा १०० रुपयांत 
दारू पिण्यासाठी व विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवान्याची गरज असते. 
यासाठीची वयोमर्यादा ही २१ वर्षे आहे. हा परवाना एक दिवस, एक वर्ष किंवा आजीवनही  मिळू शकतो. 
दिवसाचा परवाना पाच, १०० रुपयांत वर्षभर आणि एक हजारात आजीवन परवाना दिला जातो. 

परवाना कोठे मिळतो?
मद्यसेवन करण्याचा परवाना ऑनलाइन देण्याची सुविधा आहे. त्याकरिता आधारकार्ड आवश्यक आहे. एक वर्ष किंवा आजीवन परवाना मिळविण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात अर्ज करावा लागतो.

अशी कारवाई झालीच नाही 
मद्य परवाना नसल्यास मद्य पिताना आढळल्यावर आणि त्याला विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर व बार चालकावर अशी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोंदियात केल्याचे ऐकीवात नाही.

मद्यविक्री आणि पिणाऱ्यांच्या परवान्यांचा  ताळमेळ जुळेल का?
- दारू परवान्याचे शुल्कही एक्साइजकडे भरले जाते. दुकानात एक्साइज निरीक्षक तपासणीला आले की, मद्यविक्री आणि सेवन करण्याच्या परवान्यांचा ताळमेळ जुळवला जातो. मद्यविक्री आणि पिणाऱ्यांच्या परवान्यांचा ताळमेळ जुळेल का, असा सवाल केला जात आहे.

काय आहे कायदा?
परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे मद्यविक्रेत्यांनी यासंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी, असे कायदा सांगतो.

नियम असला तरी विचारतो कोण? 
ग्राहकाकडे परवाना आहे की नाही, हे पाहण्याची आणि त्यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकलेली आहे. 
या नियमांचे कोणीही मद्यविक्रेता पालन करत नाही. एकाही मद्य विक्री दुकानात मद्य सेवन परवाना विचारला जात नाही. मात्र, मद्य विक्रेत्यांकडे मद्य सेवन परवाना रेकॉर्ड नीट ठेवले जाते. 

 

Web Title: Consume alcohol only if licensed; If not, the seller will be fined 25 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.