सुरक्षा ठेवीच्या नावावर ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:52 PM2018-04-16T22:52:26+5:302018-04-16T22:52:26+5:30

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला वीज वितरण कंपनीने ग्राहकांना दिलेल्या सामान्य वीज बिलासोबत सुरक्षा ठेव भरण्याबाबतचेही अतिरिक्त बिल पाठविले आहे. त्यामुळे ग्राहकांची लुटमार केली जात असून ती वसुली बंद करण्याचा निर्णय घ्यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

Consumers loot in the name of security deposit | सुरक्षा ठेवीच्या नावावर ग्राहकांची लूट

सुरक्षा ठेवीच्या नावावर ग्राहकांची लूट

Next
ठळक मुद्देकारभार वीज वितरण कंपनीचा : अधीक्षक अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला वीज वितरण कंपनीने ग्राहकांना दिलेल्या सामान्य वीज बिलासोबत सुरक्षा ठेव भरण्याबाबतचेही अतिरिक्त बिल पाठविले आहे. त्यामुळे ग्राहकांची लुटमार केली जात असून ती वसुली बंद करण्याचा निर्णय घ्यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
याप्रकरणी ओबीसी संग्राम परिषदेमार्फत अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अतिरिक्त सुरक्षा ठेवच्या नावावर ग्राहकांना पाठविण्यात आलेले देयक समजण्यापलिकडे आहे. विद्युत मिटर किंवा जोडणी देताना सुरवातीलाच ग्राहकाकडून सुरक्षा ठेव रक्कम घेतली जाते. एवढेच नव्हे तर शुल्का भरणा केल्यानंतरच वीज जोडणी दिली जाते. तसेच यापुर्वीही सुरक्षा ठेवच्या नावावर वीज कंपनीने शुल्क आकारले आहे. भंडारा जिल्ह्यातील जनता दुष्काळाने ग्रासली असताना गोरगरीब व शेतकऱ्यांच्या खिशातून अतिरिक्त सुरक्षा ठेवच्या नावावर ही वसूली सुरू आहे. दुसरीकडे भारनियमन करून सामान्य जनतेला तसेच शेतकºयांना वेठीला धरले जात आहे. यापूर्वीही सुरक्षा ठेव जमा केलेली रक्कम वीज वितरण कंपनी परत करणार काय? असा उपरोधिक सवालही नागरिक विचारु लागले आहे. वीज वितरण कंपनीने सुरक्षा ठेव वसूल करण्याचा निर्णय त्वरीत थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही ओबीसी संग्राम परिषदेमार्फत देण्यात आला आहे. निवेदन देताना परिषदेचे अध्यक्ष सुभाष आजबले, जि.प. सभापती प्रेम वनवे, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, कुंठलीक चौरागडे, जितेंद्र चवरे, पं.स. सदस्य दर्शन फंदे, विश्वजीत घरडे, अनिल गिरडकर, किरण चवळे, अविनाश बावणे, अमित बारस्कर, अक्षय भुरले, विनोद निंबार्ते, राजू सुर्यवंशी, रोशन ठवकर, नरेश सेलोकर, मुन्ना भुरले आदी उपस्थित होते.

Web Title: Consumers loot in the name of security deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.