कोंढा येथे नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:32 AM2021-01-21T04:32:04+5:302021-01-21T04:32:04+5:30
राज्यमार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे कोंढा कोसरा मेन रोडवर वाहतुकीची कोंडी होत आहे, चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीने ...
राज्यमार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे कोंढा कोसरा मेन रोडवर वाहतुकीची कोंडी होत आहे, चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीने मेन रोडला लागून नवीन नाल्यांंचे बांधकाम सुरू केले आहे. ते काम करताना कोंढा कोसरा या दोन्ही गावची नळाची पाईपलाईन जेसीबी मशीनने मुख्य नाली योजनेच्या पाईपलाईनची तोडफोड केल्याने गढूळ पाणी नळांना येत आहे. चौपदरीकरण काम करणारी कंपनीच्या कामाचे नियोजन नाही. नाली काम करताना माती रोडवर ठेवतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे, असे असताना कंत्राटदाराकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही. नाली बांधकाम करतेवेळी पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर जिकडे-तिकडे पाणी साचले, ती दुरुस्त करून देण्यासाठी त्वरित उपाययोजना केली जात नाही. यामुळे जनतेला गढूळ गाळयुक्त पाणी प्यावे लागत आहे. गढूळ पाणी पिल्यास अनेकांना दूषित पाण्याचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा जनतेच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतने लवकरात लवकर कंपनीकडून पाईपलाईन दुरुस्त करून घेतली पाहिजे. चौपदरीकरण काम करणाऱ्या कंपनीने त्वरित नळाची पाईपलाईन दुरुस्त करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.