कार्यात सातत्य जोपासणारा सण अक्षयतृतीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:41 PM2019-05-06T22:41:18+5:302019-05-06T22:41:42+5:30

सतत राहते ते म्हणजे अक्षय. केलेल्या कार्यात सातत्य जोपासणारा सण म्हणजे अक्षयतृतीया. मराठी महिन्यातील दुसरा महिना वैशाख महिना. या महिन्यात सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवत असते. सभोवतालच्या सृष्टीवर त्याचा प्रभाव पडत असतो. या महिन्याला वैशाख वणवा असंही म्हणतात.

The continuous continuation of the work is the Akshatriya | कार्यात सातत्य जोपासणारा सण अक्षयतृतीया

कार्यात सातत्य जोपासणारा सण अक्षयतृतीया

googlenewsNext
ठळक मुद्देबाजारात उलाढाल : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त, कळसा खरेदीसाठी बाजारात गर्दी

माणिक खर्डेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सासरा : सतत राहते ते म्हणजे अक्षय. केलेल्या कार्यात सातत्य जोपासणारा सण म्हणजे अक्षयतृतीया. मराठी महिन्यातील दुसरा महिना वैशाख महिना. या महिन्यात सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवत असते. सभोवतालच्या सृष्टीवर त्याचा प्रभाव पडत असतो. या महिन्याला वैशाख वणवा असंही म्हणतात. या महिन्यात प्रत्येकजण गारव्याच्या शोधात असल्याचचे दिसते. थंड पाणी पिणे, थंड पाण्याने आंघोळ करणे आल्हाददायक वाटते. अक्षय तृतीया हा सण विष्णुप्रित्यर्थ सण समजला जातो. या दिवशी वसंत माधवाची पूजा व तहानलेल्यांसाठी पाण्याचे माठ दान केले जातात. या महिन्यातील हवामानाला अनुसरुनच व्रतवैकल्य केले जातात. या महिन्यात सुर्याच्या दाहकतेचा सर्व सजीवांना फटका बसत असतो. सर्वत्र वातावरण तापलेले असते.
त्यामुळे हिंदू संस्कृतीत या महिन्यात गरीबांना कुंभदान, सार्वजनिक पाणपोई सुरू करणे, गरजूंना पंखा, छत्री व चंदन दान केले जाते. हा सण वसंत ऋतूत येत असल्याने हिंदू संस्कृतीत स्त्रिया वसंतोत्सव साजरा करत असतात. यावेळी त्या कैऱ्यांचे पन्हे तयार करुन पिण्यासाठी देत असतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी मृत पितरांसाठी श्राद्ध अपिंडक किंवा तीळ तर्पण करण्याचा प्रघात आहे. या सणाच्या दिवशी आपले पूर्वज पाणी पिण्यास येतात अशी कल्पना आहे. या महिन्यात जे सण उत्सव येतात त्यात अक्षयतृतीया हा सण अत्यंत महत्वाचा सण समजला जातो. हा सण हिंदू सण उत्सवात साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या तृतीयेला जे काही कार्य आपण करतो तो अक्षय राहते. म्हणजे सतत राहते अशी आपली धारणा आहे.
या दिवशी जप, होम, दान केले जाते. ही तृतीया मंगळवारला आली आणि त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अक्षयतृतीया महापूण्यकारक समजली जाते. सर्वत्र हा सण साजरा केला जातो.

Web Title: The continuous continuation of the work is the Akshatriya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.