तुटपुंज्या मानधनावर वाहनचालकांची अविरत सेवा
By admin | Published: August 1, 2015 12:14 AM2015-08-01T00:14:34+5:302015-08-01T00:14:34+5:30
भंडारा जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात जवळपास ८ वर्षापासून तुटपूंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने २४ तास अविरत सेवा देत आहेत.
सर्वांचेच दुर्लक्ष : आठ वर्षांपासून मदतीची प्रतीक्षा
तत्वराज रामटेके पहेला
भंडारा जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात जवळपास ८ वर्षापासून तुटपूंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने २४ तास अविरत सेवा देत आहेत. परंतु त्यांच्या समस्याकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे अधिकारी लक्ष देत नाही. महाराष्ट्र शासनाने जननी शिशू योजना कार्यान्वीत केली. त्यात गरोदर माता व नवजात शिशू यांना २४ तास सेवा देवून सुद्धा वाहनचालकाच्या समस्येकडे लक्ष देण्याकरिता कुणाकडेच वेळ दिसत नाही.
ग्रामपंचायतमध्ये काम करणारे शिपाई यांना सुद्धा शासन सेवेत सामावून घेतले जाते. तसेच आशा वर्कर यांना सुद्धा एनएमच्या अभ्यासक्रमासाठी दोन टक्के आरक्षण राखून ठेवले आहे. मग वाहनचालकांना शासन सेवेत का सामावून घेतले जात नाहीत. उलट ज्या चपराशाकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे अशा चपराशांना वाहनचालक या पदावर पदोन्नती दिली जाते. मग वाहनचालकाची सेवा सरळ भरतीने का केली जात नाही. याबाबत कंत्राटी वाहनचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांनी अधिकाऱ्यांची विचारपूस केली असता वाहनचालकांची पोस्टींग रद्द केली आहे तेव्हा आरोग्य विभागातीलच वाहन चालकाचीच सेवा रद्द का झाली.
शासनातर्फे लघु पाटबंधारे विभाग, सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग इत्यादी विभागातील सर्वच जागा भरल्या जातात तर मग २४ तास सेवा देणारे आरोग्य विभत्तगातील कंत्राटी वाहनचालक यांची सरळ भरती का केली जात नाही.
या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी तसेच अधिकाऱ्यांनी लक्ष देवून कंत्राटी वाहनचालकांना न्याय मिळवून देण्याची वाहन चालकाची मागणी आहे. याबाबत राज्य शासनाचे वित्त आणि नियोजन वने मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांचेकडे सदर मागण्याचे निवेदन दिले असून त्यांनी कार्यवाहीसाठी आयुक्त तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना पत्र दिले आहे.