सनफ्लॅग कामगारांचा कराराचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:47 PM2017-10-18T23:47:03+5:302017-10-18T23:47:27+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी भंडारा रोड आणि कामगार संघटना यांच्यातील वेतन वृद्धी व बोनसबाबद पुढील तीन वर्षांसाठी आज करार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी भंडारा रोड आणि कामगार संघटना यांच्यातील वेतन वृद्धी व बोनसबाबद पुढील तीन वर्षांसाठी आज करार करण्यात आला. आठ दिवसांपासून कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात सुरु असलेल्या वाटाघाटीला अंतिम मंजुरी नागपूर येथे झालेल्या बैठकीत देण्यात आली. दिवाळीच्या मोक्यावर सुरु असलेले बोनस व वेतन वृद्धी बाबद तिढा सुटल्यामुळे कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.
सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनीत सध्यस्थित ५७८ स्थायी कामगार आहेत. कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यात वेतन वृद्धी व बोनस करीता तीन वर्षांपूर्वी झालेला करार ३१ मार्च रोजी संपुष्ठात आला होता . नियमानुसार करार संपुष्ठात येण्यापूर्वी संघटना आणि व्यवस्थापन यांनी कराराच्या अटी बाबद कारवाही करणे आवश्यक आहे. याबाबद संघटनेने सनफ्लॅग व्यवस्थापनाला अनेकदा सूचना केल्या. पण याबाबद कंपनी व्यवस्थापनाचे अडेलतट्टू धोरणामुळे बैठकी फिस्कटल्या होत्या. कामगार संघटना यांनी वेतन वृद्धी व बोनस करीता तात्काळ निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापनाला अनेकदा सूचना केल्या पण त्याकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनांनी केला होता. करारासाठी पूर्वरत प्रचलित पद्धत किंवा कंपनीच्या नफ्यानुसार पगार वाढ कारण्याची मागणी सनफ्लॅग व्यवस्थापन यांचेकडे केली आहे. गत वर्षात सनफ्लॅग कंपनीला ६५ करोड सुद्धा नफा झाला होता. सनफ्लॅग कंपनीला हा नफा कंपनीवर असलेला कर्ज फेडून झाला असल्यामुळे कंपनीची आर्थिक बाजू भक्कम आहे. सन २०१४ रे २०१७ या काळात सनफ्लॅग कंपनीला १४१ करोड रुपयाचा नफा झाला. त्यातुलनेत वेतनवृद्धी व बोनस कामगारांना मिळावा अशी मागणी संघटनांनी केली होती.
बुधवारला नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सनफ्लॅग व्यवस्थापन व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. यात पुढील तीन वर्षांकरिता ७,२०० रुपये वेतनवृद्धी व बोनस करारानुसार पहिल्या वर्षाकरिता २८ हजार ५०० रुपये दुसºया वर्षाकरिता २९ हजार ५०० व तिसºया वर्षाकरिता ३० हजार ५०० याप्रमाणे मंजूर करण्यात आले होते. यापूर्वी तीन वर्षांपूर्वी ६ हजार ६५० रुपये वेतन वृद्धी व २६ हजार रुपये बोनस जाहीर झाले होते. यावेळी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विजय बांडेबुचे , महासचिव मिलिंद वासनिक किशोर मारवाडे , विजेंद्र नेमा , विकास फुके, अमोद डाकरे, विकास बांते , रवींद्र बोरकर, ज्ञानेश्वर वंजारी, शिवकुमार सार्वे , शैलेंद्र दुबे, सारंग व्यवहारे, प्रदीप नागपुरे, जावेद , डी एन यादव, संदेश गणवीर, प्रकाश बलभद्रे व महेश बर्वेकर उपस्थित होते.