घराची भिंत कोसळून ठेकेदाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 10:14 PM2017-12-28T22:14:07+5:302017-12-28T22:14:27+5:30
घरकुलाचे बांधकाम सुरू असताना जीर्ण घराची भिंत कोसळली. यात दबून ठेकेदाराचा मृत्यू झाला. यात दोन महिला जखमी झाले. ही घटना गुरूवारला दुपारी १२ वाजता रेंगेपार (पांजरा) गावात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : घरकुलाचे बांधकाम सुरू असताना जीर्ण घराची भिंत कोसळली. यात दबून ठेकेदाराचा मृत्यू झाला. यात दोन महिला जखमी झाले. ही घटना गुरूवारला दुपारी १२ वाजता रेंगेपार (पांजरा) गावात घडली. संजय तरारे (३५) रा.सोनेगाव असे मृत ठेकेदाराचे नाव आहे.
वैनगंगा नदी काठावरील रेंगेपार गावात घरकुलाचे पॅकेज मंजूर झाले असून गरजू लाभार्थ्यांचे ६० घरकुलांचे बांधकाम सुरु आहेत. यामुळे या घरकूल बांधकामाचे कामे गावातील ठेकेदार व कामगार करीत आहेत. गावात दामू ठाकरे यांना पॅकेज अंतर्गत घरकुल मंजूर झाले. त्यांनी घरकुल बांधकामाचे कंत्राट सोनेगाव येथील संजय तरारे यांना दिले. जीर्ण घराशेजारी घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. घरांची भिंत बांधकाम करण्यासाठी संजयने गावातील कुंदा ठाकरे (३५) या मजूर महिलेला सोबतीला घेतले. विटाची जोडणी करीत असताना संजय यांच्या अंगावर जुन्या घरांची भिंत कोसळली. यात संजयचा मृत्यू झाला. कुंदा ठाकरे ैही महिला जखमी झाली. घरा शेजारच्या रमिका ठाकरे (४५) या नवीन घराचे बांधकाम बघत होत्या. त्यांच्यासमोर ही घटना घडल्याने त्या घटनास्थळावर बेशुद्ध पडल्या. गावकºयांच्या मदतीने जखमी महिलांना तुमसर उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. मृताच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. घटनेची सिहोरा पोलिसांनी नोंद केली आहे. जखमी मजूर महिलांना रोहयो अंतर्गत कामगार कल्याण योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.