खराशी पूल बांधकामात कंत्राटदाराची मनमानी

By admin | Published: June 18, 2016 12:27 AM2016-06-18T00:27:29+5:302016-06-18T00:27:29+5:30

जवळील खराशी पुलाच्या बांधकामामुळे मातीचे योग्य नियोजन न करता शेत शिवारातील बांधासमोरच मातीचे ढिगारे ठेवण्यात आले आहे.

Contractor's arbitrariness in the construction of a proper bridge | खराशी पूल बांधकामात कंत्राटदाराची मनमानी

खराशी पूल बांधकामात कंत्राटदाराची मनमानी

Next

वरिष्ठ अभियंत्याचे वलय : ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोली
पालांदूर : जवळील खराशी पुलाच्या बांधकामामुळे मातीचे योग्य नियोजन न करता शेत शिवारातील बांधासमोरच मातीचे ढिगारे ठेवण्यात आले आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यााला ब्रेक मिळाल्याने २५-३० शेतकऱ्यांची ६०-७० एकर जमिनीला अडचण निर्माण होत आहे. तसेच रहदारीकरिता असलेल्या रस्त्यावर मातीचे उंच भरण दिल्याने रस्ताच बंद झाला आहे. याविरोधात विचारणा केली असता बांधकामावरील जबाबदार व्यक्ती अरेरावीची भाषा बोलतो. लेखी निवेदनसुद्धा कार्यकारी अभियंत्यांना देऊनही कारवाई शुन्य आहे.
बांधकाम करण्यापूर्वी नियोजन महत्वाचे असते. याकरिता कंत्राटदार व अभियंते यांचे बांधकामावर नियमित हजेरी महत्वाची असते. एका अडचणीतून दुसरी अडचण तयार न होता योग्य दिशेने काम होणे महत्वाचे असते.
मात्र खराशी पूल बांधकामावर अनियमितता लोकांच्या चर्चेतून चर्चीली जात आहे. लोकप्रतिनिधीच्या कानावर विषय जाऊनही चर्चा शून्य आहे. लोकप्रतिनिधीच कंत्राटदार झाल्याने टक्केवारीत सरशी वाढली आहे.
प्रतिनिधीच बोलायला तयार नसताना तर आमची गोची निश्चित आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. खराशी पुलाच्या दोन्ही कडेला नाल्यातीलच माती काढून ढिग रिचविण्यात आले. नंतर जेसीबीच्या सहायाने सपाटीकरण करण्यात आले आहे.
खासदार नाना पटोले यांच्या खासदार निधीतून ६.५० टक्क्े रूपये खराशी पुलाच्या बांधकामााठी मिळाले आहेत. भूमिपूजन सोहळ्याला वर्ष लोटला मात्र काम अर्धेही झाले नाही या पावसाळ्यात या रस्त्यावर रहदारीला मोठी अडचण होणार आहे. सर्वात जास्त फटका विद्यार्थी वर्गाला बसणार असून याला जबाबदार पुलाचे मंदगतीने सुरू असलेले बांधकाम राहणार आहे. राजकारणी, लोकप्रतिनिधीचा बेजबाबदार वाढल्याने नियमित वेळेत काम होत नाही याचा फटका सरळ जनतेला भोगावा लागत आहे.
खराशी-पालांदूर रस्त्याच्या कडेला दुतर्फा वनराई नटलेली होती. मात्र कंत्राटदारांच्या मनमर्जीने झाडाची कत्तल करीत वनराईला जमीनदोस्त केले.
खराशीचे सरपंच पुरूषोत्तम फटे, माजी सरपंच सुभाष ढोके, शेतकरी देविदास बोंद्रे, योगराज झलके, अनंत झलके, मुक्ता झलके, श्रीराम कहालकर, भाष्कर कहालकर, उत्तम झलके, मारोती बोंद्रे, ईश्वर भोयर यांनी प्रत्यक्ष कामावरीच्या व्यक्तींना आपबीती सांगून न ऐकल्याने लेखी निवेदन संबंधित बांधकाम विभागाला देत न्यायाची मागणी केली.
न्याय न मिळाल्यास १ जुलैला खराशी-पालांदूर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रभावित शेतकरी योगराज झलके यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Contractor's arbitrariness in the construction of a proper bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.