शासकीय झाडांवर कंत्राटदाराची कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:22 PM2018-06-11T22:22:31+5:302018-06-11T22:22:31+5:30
धनेगाव शिवारातील शासकीय झाडांची कत्तल प्रकरण शांत होत नाही, तोच पाटबंधारे विभागाचे अखत्यारीत असणाऱ्या उजव्या कालव्यावरील सोनेगाव गावाचे शेजारी असणाऱ्या झाडांची कत्तल कंत्राटदाराने केली आहे. परंतु या प्रकरणात अद्याप कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यात आली नाही.
रंजित चिंचखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : धनेगाव शिवारातील शासकीय झाडांची कत्तल प्रकरण शांत होत नाही, तोच पाटबंधारे विभागाचे अखत्यारीत असणाऱ्या उजव्या कालव्यावरील सोनेगाव गावाचे शेजारी असणाऱ्या झाडांची कत्तल कंत्राटदाराने केली आहे. परंतु या प्रकरणात अद्याप कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यात आली नाही.
सिहोरा परिसरात शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील झाडे कापण्याचे कार्य जोमात सुरु आहेत. पावसाळा पूर्वी कंत्राटदारांनी घाई गर्दी सुरु केली आहे. शेत शिवारातील खरेदी करण्यात आलेली झाडे दिवसाढवळ्या कापण्यात येत असली तरी शासकीय झाडांची कत्तल आणि या झाडाची उचल रात्रीच करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाचे अखत्यारीत असणाºया उजव्या कालव्याचे झाडे कंत्राटदाराकरवी बेकायदेशीररित्या तोडल्या जात आहेत. मौल्यवान झाडांची कत्तल करण्यात येत असताना वन विभागाची यंत्रणा बेफीकीर आहे. हरदोली वन परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाºया गावाच्या शिवारात कंत्राटदाराची दबंगगिरी सुरु झाली आहे. धनेगाव शिवारात झाडांची कत्तल प्रकरणात आरोपी वन विभागाचे अटकेत झाले नाही. या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच याच उजव्या कालव्यावर असणारी सोनेगाव गावाचे शेजारील शासकीय झाडांची कत्तल करण्यात आली आहे. उजव्या कालव्यावर असणारे चार झाडावर कंत्राटदाराने कुºहाड घातली आहे. शुक्रवारचे रात्री नियोजितरित्या ही झाडे कापण्यात आली. परंतु ही झाडे घटनास्थळावर ठेवण्यात आली नाही. ट्रॅक्टरच्या सहाय्याने मध्यरात्रीपर्यंत या शासकीय झाडांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. या झाडांची कत्तल प्रकरणात पटले नामक कंत्राटदाराचे नाव समोर आले आहे. याच कंत्राटदाराचे कामे शेतशिवारात सुरु असल्याचे गावकºयांना निदर्शनास आले आहे. पटले नामक कंत्राटदाराचे याच परिसरात वास्तव्य असल्याने शासकीय झाडांची इत्यंभूत माहिती त्यांना होती. यामुळे ही शासकीय झाडे मध्यरात्री तोडण्याचे कार्य करण्यात आले आहे. झाडे कापणे व झाडांची विल्हेवाट लावताना गावातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घोडीचोर यांना निदर्शनास येताच त्यांनी पाटबंधारे विभाग व वनविभागाचे यंत्रणेला माहिती दिली. परंतु कुणी 'टेंशन' घेण्याचे तयारीत नाहीत. वन विभागाच्या यंत्रणेमार्फत या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसून साधे पंचनामा करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. शासकीय झाडांचे कत्तल प्रकरणात प्रत्यक्षदर्शी पुरावे व साक्ष देत असले तरी वन विभागाची यंत्रणा पुढाकार घेत नाही. यामुळे वन विभागाचे कायदा व धाक आता नाही. असे चित्र आहे. हरदोली वन परिक्षेत्र कार्यालयाचे हद्दीत हा सावळागोंधळ सुरु आहे. या प्रकरणात जिल्हा वन विभाग कार्यालयाचे अधिकारी शांत आहेत. सामान्य व्यक्तीने हे वृक्ष तोडले असते तर वन विभागाने कारवाई केली असती अशी माहिती मिळाली आहे.
सोनेगाव शिवारातील झाडांची कत्तल प्रकरणाची अद्याप तक्रार झाली नाही. तक्रार आल्यास निश्चितच कारवाई करण्यात येईल.
-वाय.एस. साठवणे, सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी, हरदोली.
सोनेगाव शिवारात उजव्या कालव्यावर असणारी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. वन विभाग व पाटबंधारे विभागाला माहिती दिली असून ठेकेदार विरोधात फौजदारी कारवाई झाली पाहिजे.
-जितेंद्र घोडीचोर, सोनेगाव.